दिन, दिन दिवाळी, गाई म्हशी ववाळी!

आज वसुबारस म्हणजेच गाय-गोऱ्हांची बारस. आज संध्याकाळी शेतकरी गोठ्यात दिवे लावतील आणि पशुधन उजळून निघेल. 'दिन, दिन दिवाळी, गाई म्हशी ववाळी' असं म्हणत दीपोत्सव आजपासून सुरु होतोय. दिवाळी म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा सण! बटण दाबल्यानंतर लख्ख उजेड देणारे लाईटचे दिवे घरोघरी आले तरी इवलीशी ज्योत पेटल्यानंतर काळोख दूर करणारा दिवा काही माणसाच्या मनातून जात नाही. जाणारही नाही. दिवा मातीचा असो, धातूचा असो, सोन्याचांदीचा असो...तो माणसाला अंधारावर मात करायला शिकवतो. दिवाळीत असे असंख्य दिवे आपआपल्यापरीनं लावले जातात. त्यासाठी घरोघरी दिव्यांची खरेदी होते.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.