ऊसदर आंदोलन अखेर भडकलंच!

उसाला पहिला हप्ता किमान तीन हजार रुपये द्या, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेन सुरु केलेल्या आंदोलनानं आता उग्र रुप धारणं केलंय. राज्यकर्ते लक्ष देत नाहीत, हे स्पष्ट झाल्यानं कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत. सकाळपासून पश्चिम महाराष्ट्रातील वाहतूक विस्कळीत झालीय. खबरदारीचा उपाय म्हणून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक बंद करण्यात आल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. सरकारंन पोलीस बळाचा वापर करुन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करु नये, अन्यथा होणाऱ्या परिणामांना तेच जबाबदार असतील, असं स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं म्हटलंय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.