अंधश्रद्धेची इडा पिडा टळो...!

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना तातडीनं पकडावं तसंच दाभोलकरांच्या मृत्यूनंतर तातडीनं जादूटोणा विरोधी वटहुकूम काढणाऱ्या सरकारनं नागपूरला होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करावा, या मागणीसाठी  मुंबईत (2 डिसेंबर) भव्य मोर्चा काढण्यात आला. अंधश्रध्दा निर्मूनल समिती, परिवर्तनवादी संघटना, वारकरी संप्रदाय आण‌ि राजकीय पक्षांनी काढलेल्या या मोर्चानं राजधानी मुंबई दणाणून गेली. सुमारे 10 हजार कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.