फुलला कार्नेशन फुलांचा मळा...!

शेतीतही सध्या आधुनिकतेचं वारं वाहतंय. पारंपरिक शेतीला फाटा देऊन अनेक छोटे-मोठे शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून, शेतीत विविध प्रयोग करत असून त्यांना चांगल यश येताना पाहायला मिळतंय. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पडगाव पोटोळे इथल्या रंगनाथ मल्हारी गाडकवाड यांनी एक एकर क्षेत्रात ग्रीन हाऊसमध्ये कार्नेशन फुलांची लागवड केली. 55 लाखांची गुंतवणूक करुन उभारलेल्या ग्रीन हाऊसमधून त्यांना गेल्या दोन वर्षात आठ लाखांचा निव्वळ नफा झालाय. प्रखर इच्छाशक्ती, जिद्द, यांच्या जोडीला योग्य प्रशिक्षण मिळाल्यामुळं जागतिक बाजारपेठेचं भान ठेऊन योग्य हंगाम साधण्यात त्यांना यश मिळालं. त्यांची यशोगाथा आज पंचक्रोशीत चर्चेचा विषय झालीय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.