'इंडिया ग्रेप हार्वेस्ट' विंचूरमध्ये

नाशिक हा भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक द्राक्ष लागवड करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. वायनरीजमुळं 'वाईन सिटी' म्हणून पुढे येणारं नाशिक शहर पर्यटकांना चांगलंच आकर्षित करतंय. वाईन टुरिझमसाठी तर नाशिक हॉट-स्पॉटच आहे. आपली हीच ओळख टिकवून ठेवण्यासाठी नाशिकमधील विंचूर वाईन यार्डला १४ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०१४ दरम्यान ‘इंडिया ग्रेप हार्वेस्ट 2014’ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. भारताचे कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते आणि राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ तसंच खासदार समीर भूजबळ यांच्या उपस्थितीत त्याचं औपचारिक उद्घाटन नाशिकमधील हॉटेल एमराल्ड पार्क इथं पार पडलं.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.