पोपटी पार्ट्या रंगू लागल्या...!

अलिबाग – गुलाबी थंडी बोचरी व्हायला लागली, की रायगड जिल्ह्यात पोपटी पार्ट्या रंगू लागतात. आपल्या मित्रमंडळींना, सग्यासोयऱ्यांना जमवायचं. रात्री बोचऱ्या थंडीत आभाळाखाली शेकोटीसंगे पोपटीवर ताव मारायचा. हा सगळा प्रेमभरे मामला आता रायगड जिल्ह्याच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग झालाय. सध्या अशा पोपटी पार्ट्या जोरात रंगू लागल्यात. निवडणुका तोंडावर आल्यानं निवडणुकीचं पहिलं आवतान पोपटी पार्ट्यांसाठी दिलं जात असल्याचं चित्र पहायला मिळतंय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.