महाकवीचा शेवटचा प्रवास....

ब्युरो रिपोर्ट

आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढणारा महाकवी, पँथर नामदेव ढसाळ यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आलेल्या पॅंथर सैनिकांनी ढसाळांचा विद्रोह जागा ठेवण्याचा निर्धार व्यक्त करुन त्यांना शेवटचा निरोप दिला. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी वडाळ्याच्या आंबेडकर कॉलेजमध्ये ठेवण्यात आलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, गृहमंत्री आर. आर. पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, यांच्यासह विविध जातीधर्मातील हजारो लोकांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. दुपारी तिथून अंत्ययात्रा निघाली. सायंकाळी चैत्यभूमीवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, जामवंत धोटे आदी दलित चळवळीतील नेतेमंडळींसह पॅंथर सैनिक यावेळी उपस्थित होते. स्वत:ला जाळून घेताना जणू हा महाकवी सांगत होता....

''सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी,
निवार्णाकडे-निर्वाणम्-शांतम्...''

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.