अशी असते गौळाऊ गाय..!

ब्युरो रिपोर्ट

महाराष्ट्रात गाई-बैलांच्या प्रामुख्यानं चार जाती आढळतात. तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांच्यात वेगवेगळी वैशिष्ट्यं असतात. त्यांची अंगकाठी, बांधा असं सगळंच वेगवेगळं असतं. विदर्भातील गौळाऊ ही जात आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मोठ्या प्रमाणात 'क्रॉस ब्रीडींग' झाल्यामुळं मूळ गौळाऊ वाणंच आता दुर्मीळ झालंय. हे वाण शोधून त्याचा विकास व्हावा, या उद्देशानं 'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ जनावरांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी उपस्थित कास्तकऱ्यांना मूळ गौळाऊ गाय कशी ओळखावी, तिची वैशिष्ट्य कोणती...आदींबाबत नागपुरच्या पशुवैद्यकिय महाविद्यालयातील पशुवंश शास्त्रज्ञ डॉं. अरुण सिरोथिया यांनी माहिती दिली.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.