बॉयलरआधीच उभा ऊस पेटला

सहकारमंत्र्यांचाच फड जाळला यंदाच्या हंगामात सुरू झालेलं ऊसदरासाठीचं आंदोलन आता चांगलंच भडकलंय. कारखान्याचे बॉयलर पेटण्याआधीच शेतातील उभा ऊस पेटू लागलाय. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनाच त्याचा पहिला फटका बसला. त्यांच्या इंदापुरातल्या शेतातील उभा ऊस पेटवून देण्यात आलाय. आता या जाळपोळीचा धूर राज्यभरात पसरतोय. त्यातच पोलीस गोळीबारात तरुण शेतकऱ्याचा बळी गेल्यानं सांगली जिल्हा अजूनही खदखदतोय.
   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.