भंवरलाल जैन, संस्थापक, जैन उद्योग समूह

जैन उद्योग समूहाचे संस्थापक भंवरलाल जैन यांनी एफडीआयवर दिलेली प्रतिक्रिया. 'भारत4इंडिया'चे संपादक मंदार फणसे यांनी घेतलेल्या मुलाखतीत जैन यांनी एफडीआयबद्दल सविस्तर भूमिका मांडलीय. एफडीआयमुळं होणाऱ्या फायद्या-तोट्याचा आलेखच त्यांनी उभा केलाय. त्यांची संपूर्ण मुलाखत लवकरच तुम्ही 'विशेष' या सदरात पाहू शकता. 

   

Comments (2)

  • Guest (शशि kore)

    बेस्ट इंटरव्यू.एक्सपोर्ट पालिसी?

  • Guest (किशोर दळवी)

    परकीय गुंतवणुकीबाबत भंवरलाल जैन यांचे विचार खूप मोलाचे आहेत. याचा कुठेतरी विचार व्हावा. परकीय गुंतवणुकीची आपल्याला गरज आहे. पण भारत जर एक मोठी बाजारपेठ असेल आणि त्यांची आपल्याकडे पुरवठा करायची क्षमता असेल तर त्याचा फायदा घ्यायलाच हवा. पण केवळ ३५ टक्के आपाला वाटा ठेऊन आपण पदरात काय खास पाडून घेणार नाहीत. जैन सरांच्या मते ते ५० टक्के असावे. पण मी तर म्हणतो तो वाटा त्याहून अधिक असावा. कारण मार्केट आपले आहे तर ते नाणे आपण वाजवून घ्यायलाच हवे. आपल्या शेतीमालाला जागतिक बाजारपेठ मिळाली तर आपण खूपच पुढे जाऊ शकू असे दिसत असले तरी आपल्या कर्मदरिद्री राजकारण्यांनी आणि प्रशासकीय व्यवस्थेने त्याचे मातेरे केले आहे. सुपिक जमीनी नापीक घोषित करून त्यावर रियल इस्टेटचा नांगर फिरवला आहे. भारताला लाभलेले पाणी, जमीन, सुर्यप्रकाश याचा विचार करता एकेकाळच्या कृषीप्रधान देशात कृषीक्षेत्राची अक्षम्य मुस्कटदाबी होते. आदिवासी आपल्या हक्कासाठी जसे नक्षलवादाचा आसरा घेतात तसे शेतकरी का घेत नाही याचे नवल वाटावे अशी परिस्थिती आहे. केवळ राजकारण्याना दोष देणेही चुकीचे आहे, कारण त्यांना आपण तिथे बसवले आहे. मात्र त्याला निवडताना आपल्यात प्रमाणिकपणा नसल्याने आपण त्यांची गचेंडी पकडून त्यांना जाब विचारत नाहीत. परकीय गुंतवणुकीचा पुन्ह्यांदा विचार व्हायला हवा. त्यात आपण ठरवू ती दिशा असायला हवी. केवळ ओबामा किंवा युरोपीय देशांची हुजरेगिरी करून चालणार नाही. आर्थिक मंदीच्या काळातही आता वेळ आली आहे आपण नेतृत्व आणि दिशा ठरवण्याची. या संधीचे सोने करावे नाहीतर गुलामीचा इतिहास आपल्या पाठीशी आहेच.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.