मराठवाडा तहानेनं व्याकूळलाय...

मराठवाड्यात यंदा अत्यंत तुरळक पाऊस झालाय. त्यामुळं मागील दोन दशकात पहिल्यांदाच पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झालीय. औरंगाबादपासून केवळ दहा किलोमीटरवर असलेल्या वडगाव कोल्हाटी येथील गावकऱ्यांना तहान भागवायलाही पाणी नाही. विशेष म्हणजे, हे गाव एमआयडीसी बजाजनगर परिसरात आहे. येथील औद्योगिक वसाहतीलाही पाणीटंचाईचा मोठा फटका बसला असून अनेक उद्योगधंदेही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जवळपास संपूर्ण मराठवाड्यात अशीच परिस्थिती आहे.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.