नंदेश उमपांचा नवीन प्रयोग

अपर्णा देशपांडे

मुंबई - लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता त्यांचा मुलगा नंदेश उमप सज्ज झालाय. पुन्हा एकदा 'जांभूळ आख्यान' रंगमंचावर आलंय. तेही दोन अंकी नाटकाच्या रूपात. यानिमित्तानं लोकशाहीर विठ्ठल उमपांचं काय स्वप्न होतं, हे नंदेशकडून जाणून घेतलंय, आमची रिपोर्टर अपर्णा देशपांडेनं...


jambhul aakhyan bharat4india.com 1.png'जांभूळ आख्यान', गोंधळ या लोककलेतून सादर होणारी एक नाट्यात्म कथा. एकदा पांडवांच्या घरी आलेला कर्ण द्रौपदीला भावतो आणि पाच पांडवांसोबत हा सहावा आपला पती असता तर? असा प्रश्न तिच्या मनात येतो. त्यानंतर द्रौपदीच्या मनात आलेला प्रश्न म्हणजे पाप होय. या पापाचं क्षालन करण्यासाठी श्रीकृष्ण पांडवांना द्रौपदीसह जांभूळाच्या वनात भोजनाला नेतात. भोजनानंतर त्या संपूर्ण वनात एकाच झाडाला लागलेलं जांभूळ भीम तोडतो. त्या एका जांभळावर संपूर्ण दिवस घालवणारा एक तपस्वी ऋषी कोपेल, या भीतीनं मग ते जांभूळ परत झाडाच्या देठी लावण्याचा प्रयत्न प्रत्येक पांडव करतो. पण द्रौपदीच्या मनात आलेल्या कर्णाच्या इच्छेमुळं ते जांभूळ काही देठी लागत नाही. पण अखेर श्रीकृष्णाच्या म्हणण्यानंतर द्रौपदी आपल्या मनातली बाब उघडपणं सांगते आणि ते जांभूळ झाडाला लागतं. पण ते उलट्या देठी. म्हणून जांभळाला दोन्ही बाजूनं देठ आहे, अशी ही आख्यायिका आहे.  

 

jambhul aakhyan bharat4india.com 3लोकशाहीर विठ्ठल उमप हे 'जांभूळ आख्यान' सादर करायचे. त्यांनी विठ्ठल उमप थिएटर्सतर्फे हे नाटक बरीच वर्षं सादर केलं. त्यांच्या पश्चात आता त्यांचा मुलगा नंदेश उमप जुन्या सहकाऱ्यांसोबतच त्यात नावीन्याची भर टाकून, दोन अंकी नाटकाच्या रूपात 'जांभूळ आख्यान'  पुन्हा रंगमंचावर घेऊन आलाय.  मात्र हे 'जांभूळ आख्यान' परदेशात नेण्याचं लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं स्वप्न होतं. ते पूर्ण होऊ शकलं नव्हतं. आता तेच स्वप्न पूर्ण करण्याचा विश्वास नंदेश उमप यानं व्यक्त केलाय. 

 

- अपर्णा देशपांडे

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.