पुणे अॅग्रीकल्चर मार्केट

ब्युरो रिपोर्ट

सामान्य शेतकऱ्यांचा शेतीमाल तोही थेट स्टार हॉटेलमध्ये! वेगळी संकल्पना आहे ना... पुण्यात 'फार्मर मार्केट' या नावाचं शेतमालाचं प्रदर्शन कोरेगाव इथल्य़ा पॉश वेस्ट इन हॉटेलमध्ये भरवण्यात आलं होतं.


एका दिवसाच्या या प्रदर्शनीत एक्पोर्ट क्वालिटीचा सेंद्रीय शेतीमाल ग्राहकांसाठी थेट उपलब्ध करुन देण्यात आला होता. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला सेंद्रीय शेतीमाल थेट त्यांच्याकडून विकत घेऊन या ठिकाणी ठेवला जातो.

ताजा भाजीपाला, फळे, मसाल्याचे पदार्थ ते मध, लोणची आणि दुग्धजन्य पदार्थ, हवाबंद नारळपाणी ते वाईनचे स्टॉल यामध्ये लावण्यात आले होते. या फार्मर मार्केटला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. सामान्य शेतकऱ्याच्या शेतीमालाला मोठं मार्केट उपलब्ध करुन देण्याची संकल्पना यामागे आहे. कॅरन आनंद या सेलिब्रिटी आहार तज्ज्ञाची ही कल्पना होती.

सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यांतून आलेल्या शेतकऱ्यांनी इथं आपले स्टॉल्स लावले होते. यातून मिळालेला फायदा हा आयोजक आणि शेतकऱ्य़ामध्ये समान रितीनं वाटला जातो. मिळालेला प्रतिसाद पाहून आयोजकांनी दर महिन्याला हे प्रदर्शन भरवण्याचा मानस व्यक्त केलाय.  

   

Comments (1)

  • Guest (गोपाल मोटघरे)

    शेतकर्यांच्या शेत माला करीता मिळाल महत्वपूर्ण व्यासपीठ. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकर्यांन निश्चित प्रोत्साहन मिळेल.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.