'तंदुरी नाईट्स- डिलिशियस डिसेंबर 2012'

नागपूर – संत्र्यांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे.  राज्यातील विविध प्रश्नांमुळं सरकार आणि विरोधक यांच्यातील वादावादीत इथलं दिवसभरातलं हवामान तप्त झालेलं आहे. विरंगुळा हवाहवासा वाटणाऱ्या या तप्त वातावरणात इथली सायंकाळ मात्र स्वादिस्ट झालीय ती इथं भरलेल्या एका फूड फेस्टिव्हलमुळं.  हे आहे 'तंदुरी नाईट्स- डिलिशियस डिसेंबर 2012'  हे फूड फेस्टिव्हल. श्री बाळासाहेब तिरपुडे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी यांनी हे फेस्टिव्हल आयोजित केलंय. 'भारत4इंडिया' या महोत्सवात मीडिया पार्टनर आहे. इथं येणाऱ्या खवय्यांसाठी आंतरराष्ट्रीय पदार्थांपासून ते देशी पदार्थांची रेलचेल आहे. या फूड फेस्टिव्हलची लज्जत आपण 13 ते 16 डिसेंबर या दरम्यान घेऊ शकता. 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.