आर. आर. पाटील, गृहमंत्रीकल्याण - ड्रायव्हिंग लायसन्स नसताना ज्याच्याकडून अपघात होईल, अश्या व्यक्तीला सरकारी आणि खाजगी क्षेत्रात नोकरी मिळणार नाही, अश्याप्रकारची उपाययोजना विचाराधीन असल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितलं. कल्याण इथं राज्य सरकारच्या 'रस्ता सुरक्षा अभियान' या कार्यक्रमात ते बोलत होते. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करणं, कारावासाची शिक्षा देणं यापेक्षा कठोर शिक्षा देण्याची वेळ आता आली असल्याचंही ते म्हणाले.
Tags |
||
Comments
|