छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री : भाग – 2

मुंबई - राज्यातली दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर झाली असून त्याचा सामना पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन केला पाहिजे, असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलंय. 'लोकहो आत्ताच जागे व्हा', असं सांगायलाही ते विसरलेले नाहीत. मित्र फाऊंडेशन या संस्थेनं 'पाणी पेटतंय' या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात ते बोलत होते. सरकार दुष्काळासाठी सर्व काही करेल त्यासाठी सरकारची तिजोरी खाली करावी लागली तरी चालेल पण गाव पातळीवर चारा, ठिंबक सिंचन योजना यामध्ये मात्र घोटाळा करता कामा नये, अशी मौलिक सूचनाही भुजबळांनी केली.  यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.