थरार कोकण कड्याचा

सुमित बागुल

हरिश्चंद्रगडाचा रॅपलिंग पॉईंट म्हणजे कोकण कडा. ट्रेकिंगसाठी कठीण समजल्या जाणाऱ्या कड्यांपैकी हा एक. हा कोकणाच्या दिशेला आहे म्हणून त्याचं नाव कोकण कडा. पायथ्यावरून पाहिलं तर अंगावर येणारा आणि माथ्यावरून पहिलं तर मनात धडकी भरवणारा. कोकण कड्याहून रॅपलिंगचा थरार अनुभवायला मिळणं म्हणजे ट्रेकर्ससाठी मेजवानीच. चला तर मग आपणही घेऊया या ट्रेकिंगचा अनुभव...


 

शॅलॉम अॅडव्हेंचर्ससोबत रॅपलिंगचा थरार अनुभवण्यासाठी 'भारत4इंडिया'ची टीमही निघाली. मध्यरात्री एक वाजता हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचरी गावातून प्रवासाला सुरुवात झाली. चंद्राचा मंद प्रकाश आणि रातकिड्यांचा आवाज. जसजसा दिवस उजाडला तशी हरिश्चंद्रगडाची भव्यता दिसू लागली.  काही वेळानं प्रत्यक्ष रॅपलिंगला सुरुवात केली. पहिलाच रॅपलिंगचा अनुभव आणि तोही १८०० फूट उंचीवरून... जीव मुठीत धरूनच रॅपलिंगला सुरुवात झाली.  पण नंतर १८०० फुटांची भीती मनातून निघून गेली.

शॅलॉम अॅडव्हेंचर्सनं खास सुरक्षित खेळ म्हणून ट्रेकिंग, रॅपलिंगला पुढं आणण्यासाठी पाच दिवसीय रॅपलिंग मोहिमेचं आयोजन केलं होतं.  यात १८०० फूट उंचीचा कोकण कडा रोपच्या सहाय्यानं उतरण्याची संधी तरुण- तरुणींना मिळाली.  

रॅपलिंग मोहिमेचं पाच भागांत विभाजन

पहिला टप्पा -  ४६० फुटांचा फ्री फॉल

दुसरा टप्पा  -  ४०० फुटांची दगडी भिंत (रॉक पॅच) 

तिसरा टप्पा -  ८०० ते ८५० फुटांची दगडी भिंत आणि फ्री फॉल 

चौथा टप्पा -  ३५० ते ४०० फुटांचा शेवटचा रॅपलिंग

पाचवा टप्पा -  साडेचार किलोमीटर नळीमधून प्रवास

या मोहिमेसाठी केवळ मुंबई-पुण्यातीलच नाही, तर हैदराबाद, दिल्लीतले जवळपास 100 तरुण-तरुणी सहभागी झाले होते. 1800 फूट उंचीवरून रॅपलिंगची संधी सगळ्यांना मिळाली होती.  रॅपलिंगच्या अशा मोहिमेसाठीच 2010 साली शॅलॉम अॅडव्हेंचर्सची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालीय. 

एकूणच या मोहिमेच्या माध्यमातून अॅडव्हेंचर्स स्पोर्ट्स सुरक्षित असून त्याबाबतची भीती बाळगण्याचं कारण नाही, असंच दिसून येतंय. 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.