स्पेशल रिपोर्ट

गोळीबारात बळी पडलेल्या तबरेज सायेकरच्या आईवडिलांचा हंबरडा

मुश्ताक खान

मुश्ताक खान, रत्नागिरी

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी आंदोलनादरम्यान पोलिसांनी गोळीबार केला. त्यात तबरेज सायेकर या तरुण मच्छीमाराचा मृत्यू झाला. या घटनेला वर्ष उलटून गेलंय. पण अजूनही सरकारचा एकही प्रतिनिधी तरबेजच्या घरी गेलेला नाही किंवा त्याच्या कुटुंबीयांना कुठलीही मदत मिळालेली नाही. तबरेजच्या वडिलांनी या सरकारी वृत्तीचा निषेध केलाय. 

डोळे थकलेले... मन खचलेलं... कुणाचाही आधार नाही... वडिलांना ऑपरेशनसाठी कोणीतरी सोबत यावं यासाठी करावी लागणारी धडपड... संसाराचा गाडा हाकण्यासाठी दुर्दैवी आईला म्हातारपणी दारोदारी जाऊन करावा लागतोय मासेविक्रीचा व्यवसाय... ही परस्थिती आहे राजापूर तालुक्यातल्या साखरीनाटे गावात पोलिसांच्या गोळीबारात बळी गेलेल्या तबरेज सायेकरच्या आईवडिलांची. याला ते जबाबदार धरतात फक्त आणि फक्त सरकारला.

तबरेज सायेकर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी आंदोलनात मैदानात उतरला. परिसरातला पिढीजात मासेमारीचा व्यवसाय वाचावा यासाठी त्यानंही प्रकल्पविरोधी आक्रमक भूमिका घेतली. तो दिवस होता ११ एप्रिल २०११चा. माडबनमध्ये लोकांनी आंदोलन केलं आणि त्याचीच प्रतिक्रिया शेजारच्या साखरीनाटे गावात उमटली. इथलेही लोक आक्रमक झाले आणि त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यातच तबरेजचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले.

तबरेज हाच आईवडिलांचा एकमेव आधार होता. आज या घटनेला दीड वर्ष झालं तरी एकाही मंत्र्याने, सरकारी प्रतिनिधीने त्यांच्या घरात पाऊल ठेवलं नाही. मदत तर लांबचीच गोष्ट. एवढी उदासीनता कधी कोणीही कोणाच्याही बाबतीत दाखवली नसेल, अशी प्रतिक्रिया त्याच्या आईवडिलांनी दिली. `भारत4इंडिया`शी बोलताना तबरेजच्या आईचे अश्रू अनावर झाले. `'पाणी पाणी करून मारलं माझ्या पोराला, काय म्हणायचं या सरकारला. तो होता तोवर १००-२०० रुपये माझ्या हातात आणून द्यायचा. आता ५०-१०० रुपयांसाठी मला हिंडावं लागतंय, अशी परिस्थिती या सरकारनं केली आमची.`' या भावना आहेत तबरेजच्या आईच्या. दीड वर्षानंतरही तिच्या डोळ्यातलं पाणी सुकलेलं नाही. तिला आजही न्यायाची आशा आहे. 

पोलिसांनी केलेल्या या अमानुष प्रकाराची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी  मच्छीमार नेते अमजद बोरकर यांनी केली. पण थातूरमातूर चौकशी होऊन सर्वांना निर्दोष मुक्त करण्यात आलं, असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे या परिसरात यंत्रणेविरोधात संताप व्यक्त होत आहे.

ज्या अणुऊर्जा प्रकल्पामुळे तबरेजचा बळी गेला तो प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही, असा पक्का निर्धार इथल्या लोकांनी केलाय. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प स्थानिकांच्या सहकार्याशिवाय सुरू होऊ शकत नाही, हे उघड सत्य आहे. त्यामुळे इथल्या लोकांवर अन्याय करून, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून, किंवा त्यांच्यावर जबरदस्ती करून हा प्रकल्प रेटता येणार नाही हे नक्की.


Comments (12)

 • तबरेजच्या केस मध्ये पोलिसांची भूमिका एखाद्या सांप्रदायिक पक्षा सारखीच होती... मग न्याय का मिळणार? कसा मिळणार? आणि कोण मिळवून देणार?... त्याच्या कुटुंबाला याच्या नंतरही हेल्प मिळणार नाही हे निश्चितच आहे.... करणं अशी आहेत...
  १. हा प्रकल्प सरकारनेच लादलेला आहे.. किंबहूना मंत्र्यांच्या फायद्याचेच जास्त.
  २. तबरेज हा कोणी नेत्याचा मुलगा किंव्या नातेवाईक न्हवता
  ३. तो गरीब घराण्यातला होता... अ कॉमन. ज्याला कोणी मारले आणि का मारले हे सुद्धा विचारायचा हक्क नवा पुरताच आहे...
  ४. त्याच्या खुनाची फाईल परत उघडण्यासाठी त्याच्या घरात कोणी उरलेला नाही जो भक्कम पणे त्याच्या खुन्याची पाठलाग करेल आणि त्याला न्याय मिळवून देयील...
  ५. मला खूपच स्ट्राँग्ली म्हणायचं आहे कि त्याच्या फमिलीला असा निराधार सोडले गेलाय कारण तो अल्पसंख्यांक आहे ...

  समाजात वावरणारे सर्व भारतीय वेळ पडल्यावर एक दुसऱ्याला जात पात व धर्म विसरुन मदद करतात. पण हीच मदत आम्हा अल्पसंख्यांकांना शासनकर्त्यांकडून कधीच मिळत नाही याची आम्हाला कायम खंत राहिल.... तबरेज सायेकरची ही सत्य कथा आहे आणि हा त्यातलाच एक भाग आहे....
  मुश्ताक भाई तुम्ही हा रिपोर्ट लिहिल्या बद्दल मी आपला आभारी आहे

 • Guest (Sourabh Todkari)

  हेल्लो मुश्ताक ,विडियो क्लिप बागुन खुप वाईट वाटला यार काय चालले काय आहे तिकडे .तुमाला जो के प्रकल्प अनायाचा आहे तो आना पण निष्पाप लोकांचे जीव कशाला घेता aahat .कांग्रेस ला tar लात मारून हक्लाव्ला पाहिजे .होप तुम्ही मीडिया वाले या बाई साथी कही तरी कराल.कलजी घे न बेस्ट लक.
  रेगार्ड्स,
  सौरभ todkari

 • Guest (vishu)

  याला खरी पत्रकारिता म्हणतात .

 • Guest (शमीम आतार , नीरा ( पुरंदर ))

  मुश्ताकभाई , ऐसेंही लगे रहो, हम आपके साथ है !

 • सर धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी. आपण खरच काहीतरी आपल्या पातळीवरही केले पाहिजे. तुम्हाला काही सुचत असेल तर नक्की कळवा. मी वाट बघत आहे तुमच्या प्रतिक्रियेची...

Load More

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.