स्पेशल रिपोर्ट

एका वादळाचा प्रवास...

ब्युरो रिपोर्ट

नाव- बाळ केशव ठाकरे 


टोपणनाव -  हिंदुहृदयसम्राट, किंवा रिमोट कंट्रोल 


जन्मतारीख - 23 जानेवारी 1926 


जन्मस्थान - पुणे 

पत्नीचं नाव- मीनाताई ठाकरे

मुलं - बिंदुमाधव ठाकरे, जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे 

फ्री प्रेसमध्ये कार्टुनिस्ट म्हणून करिअरला सुरुवात, 1960 ला नोकरीचा राजीनामा

त्यांची कार्टून संडे टाईम्समध्ये प्रकाशित होत असत 

व्यंगचित्राला वाहून घेतलेलं मासिक मार्मिकची सुरुवात 

 • 19 जून 1966 ला शिवसनेची स्थापना 
 • ठाकरेंनी महाराष्ट्रातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांसोबत युती केली. 
 • व्हॅलेंटाईन डेला शिवसेनेनं कायम विरोध केला 
 • बाळासाहेब अनेकदा अॅडॉल्फ हिटलरचं जाहीर कौतुक करायचे 
 • बाळासाहेबांनी उघडपणे तमिळ बंडखोरांना पाठिंबा दिला
 • 1989ला पक्षाचं मुखपत्र सामना सुरू
 • 28 जुलै 1999 रोजी बाळासाहेबांच्या मतदान हक्कावर बंदी. 2005 ला बंदी उठवण्यात आली. 2006ला मुंबई पालिका निवडणुकीत त्यांनी मतदान केलं. 
 • 2002 ला बाळासाहेबांनी मुस्लिमांपासून संरक्षण करण्यासाठी हिंदुंना आत्मघाती पथक तयार करण्याचा अजब सल्ला दिला होता. 
 • 6 मार्च 2008 ला बाळ ठाकरेंनी सामना मुखपत्रात संपादकीय लिहिलं - 'एक बिहारी, सौ बिमारी' 
 • 'एशिया विक'ला मुलाखत देताना बाळासाहेबांनी मी हिटलरचा चाहता असून मला त्याची लाज वाटत नाही, भारतासारख्या देशाला एका हिटलरची गरज आहे, असं म्हटलं होतं.
 • बीबीसीनं बाळासाहेबांचं वर्णन - 'महाराष्ट्राचे अघोषित राजे' असं संबोधित केलं 
 • वॉशिंग्टन पोस्टनं बाळासाहेबांबद्दल लिहिताना 'शिकागोवर अल कॅपोननं ज्याप्रमाणे दहशतीच्या बळावर हुकुमत गाजवली त्या पद्धतीनं बाळासाहेबांची मुंबईवर पकड' असल्याचं म्हटलं.
 •  
 • 1998 मध्ये शिवसैनिकांनी समलैंगिक संबंधांवर आधारित हिंदी चित्रपट 'फायर'ला विरोध करत, तो चित्रपट बंद पाडला 
 • 1960 आणि 1970 मध्ये शिवसेनेनं 'बजाव पुंगी, हटाव लुंगी'चा नारा देत दक्षिण भारतीय नागरिकांना लक्ष्य बनवलं. त्यांना 'यडा गुंडू' आणि 'लुंगीवाले' असं ते संबोधायचे. 
 • 1993 च्या मुंबई दंगलीत त्यांनी शिवसैनिकांना खुलेआम सक्रिय होण्याचं आवाहन केलं. दंगलीदरम्यान शिवसेना नेते मधुकर सरपोतदार आणि इतर दोन सेनानेत्यांना शिक्षा झाली 
 • दंगलीदरम्यान 'मला अटक केल्यास उभा देश पेटेल' असं जाहीर आव्हानच त्यांनी राज्य सरकारला दिलं
 • 1996 मध्ये जगप्रसिध्द पॉप गायक मायकल जॅक्सनला त्यांनी मुंबईला आणलं 
 • 25 जुलैला 2000 ला ठाकरेंना 'सामना'मध्ये लिहिलेल्या चिथावणीखोर संपादकीयासाठी अटक करण्यात आली. त्या दिवशी संपूर्ण मुंबई ठप्प झाली होती. 
 • ठाकरेंनी विजय तेंडुलकर लिखित 'सखाराम बाईंडर' आणि 'घाशिराम कोतवाल' या नाटकांना विरोध केला. त्याशिवाय त्यांनी गोविंद निहलानींचा 'तमस, दीपा मेहतांचा 'फायर', शाहरूखच्या 'माय नेम इज खान'लाही विरोध केला 
 • शिवसेनेनं पाकिस्तानचे जगप्रसिध्द गायक गुलाम अली यांना विरोध करत त्यांचा कार्यक्रम उधळून लावला. एम. एफ. हुसेन यांच्या कलाकृतीला त्यांचा कायम विरोध होता.
 • 2009 ला बाळासाहेबांनी सचिन तेंडुलकरने मुंबई सर्व देशाची आहे, या विधानावर कडक शब्दात टीका करत 'तू केवळ आपल्या खेळावर लक्ष दे', असा सल्ला दिला. 

Comments

 • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.