स्पेशल रिपोर्ट

ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांची अपेक्षा

विवेक राजूरकर

औरंगाबाद – निसर्गत: राज्यात पाण्याबाबत विषमता आहे. 30 टक्के भाग अवर्षणग्रस्त असून त्यात मराठवाड्याचा सर्वाधिक भाग येतो. त्यामुळे अवर्षणप्रवण भागात साठणारं पाणी अवर्षणग्रस्त भागाला देणं ही काळाची गरज आहे, असं ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी 'भारत4इंडिया' शी बोलताना सांगितलं.

यातून त्यांनी मराठवाड्याला पाणी द्यायला खळखळ करू नका, असंच अप्रत्यक्ष सूचित केलंय. पावसाचा विभागवार विचार केल्यास सर्वात जास्त पाऊस कोकणात पडतो. पावसाचं प्रमाण आणि साठवण क्षमता लक्षात घेता, प्रत्येक विभागाची पाण्याची उपलब्धता आणि गरज वेगवेगळी आहे. याअगोदर शेतीच्या पाण्याचं नियोजन करण्याला महत्त्व दिलं जात होतं.  सध्या औद्योगिक आणि नागरीकरणाच्या पाण्याचं नियोजन महत्त्वाचं झालंय. त्यामुळं पाण्याचं आदानप्रदान करणं हे क्रमप्राप्त झालंय, असंही त्यांनी सूचित केलं.

पावसाचं 70 टक्के पाणी वाया जातं. त्यामुळं भूपृष्ठावरील पाणी कसं अडवता येईल, पाणी जिरवून भूजल पातळी कशी वाढवता येईल, तसंच पाणलोट क्षेत्राचा विकास कसा करता येईल, यावर इथून पुढं लक्ष केंद्रित करावं लागेलं, असंही त्यांनी सांगितलं.


Comments (1)

  • केवळ धरणे बांधून पाणी साठवण्यापेक्षाही जमीनत पाणी मुरणे गरजेचे आहे. नागरिकरणाच्या आणि विकासाच्या बेगडी विशेषणाखाली मुलभूत गोष्टींकडे दूर्लक्ष होत आहे. पर्यावरणपुरक आणि निसर्गसुलभ विकासा साधणे आता काळाची गरज आहे. त्यासाठी नियम आणि कायदे बनवायला हवेत. पाणी वापरावरही नियंत्रण असावे. जास्त पाणी वापरणाऱ्यांना जास्त दराने पाणी द्यावे. त्यामुळे धनिक लोक माजोरीपणा करणार नाहीत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणे एके काळी आपण कृषीप्रधान होतो की ज्यामुळे देशातून सोन्याचा धुर निघत होता हे विसरता कामा नये.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.