स्पेशल रिपोर्ट

बाबासाहेब शिकले साताऱ्यातील शाळेत

शशिकांत कोरे
सातारा-  जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाची सर्वोत्कृष्ट घटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे कुठे गिरवले असतील? साताऱ्यातल्या एका शाळेत. होय, या शाळेचं नाव छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल. युगपुरुषाला घडवणाऱ्या या शाळेनं बाबासाहेबांच्या आठवणी जतन करुन ठेवल्यात.

 

बाबासाहेब आमच्या शाळेचे विद्यार्थी होते, असं सांगताना आजही शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत साऱ्यांचा ऊर अभिमानानं भरुन येतो.

babasaheb ambedkar school7 नोव्हेंबर 1900 रोजी लहानगा भिमा, सातारा हायस्कूलमध्ये दाखल झाला. ब्रिटीशांच्या काळात सातारा प्रांतात केवळ हेच एक हायस्कूल होतं. त्या काळी संस्कृत, इंग्रजी, गणित, शेती आदी विषय या शाळेत शिकवले जात. ज्ञान संपादन करण्यासाठी भिमाला साथ दिली ती कृष्णाजी केशव आंबावडेकर या शिक्षकानं. 

सातारा हायस्कूल बनलं प्रतापसिंह हायस्कूल

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण ज्या सातारा हायस्कूलमध्ये झालं, त्याचं नाव नंतर श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल करण्यात आलं. साताऱ्यात शिक्षण, वाचन संस्कृती चळवळ सुरु करण्याचं काम थोरले छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी केलं होतं. या शाळेनं डॉ. बाबासाहेबांचा शाळा प्रवेश आणि शाळा सोडल्याची माहिती जतन करुन ठेवली. शाळा व्यवस्थापनानं हे रेकॉर्ड लॅमिनेशन करुन ठेवलंय. अभ्यासक, विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी झेरॅाक्स कॉपी रजिस्टर तयार केलंय. विशेष म्हणजे बाबासाहेबांचे दुर्मिळ फोटो, माहिती असणारे ग्रंथ शाळेनं उपलब्ध करुन दिलेत. शाळेच्या मुख्याध्यापिका एस. मुजावर या याबाबत माहिती देतात. 

अभिमानाची बाब

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊन आज 112 वर्षे होत आहेत. पण या शाळेतला एक विद्यार्थी या देशाची घटना लिहितो, याचा या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अभिमान वाटतो. 


Comments (1)

  • Guest (शशि satara)

    बेस्ट editing

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.