स्पेशल रिपोर्ट

शेतकऱ्यांना ऑडियो कॉन्फरन्सद्वारे शेतीविषयक मार्गदर्शन

ब्युरो रिपोर्ट

वाशीम - पेरणीनंतर शेतात राबवायची सिंचन पद्धत, खतांची मात्रा देण्याच्या वेळा आणि रोगांच्या प्रादुर्भावापासून पिकांचा बचाव याबाबत बऱ्याच शेतकऱ्यांकडं योग्य माहिती नसते. अशा वेळी महागडी औषधं आणि खतांचा वापर करून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या शेतकऱ्यांना नैराश्यही येतं. शेतकऱ्यांचा होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी उचित मार्गदर्शन व्हावं याकरता रिलायन्स फाऊंडेशननं हायटेक पद्धत राबवलीय.

यामध्ये ऑडियो कॉन्फरन्सद्वारे थेट कृषी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मोफत माहिती देण्यात येत आहे. जिल्ह्यातील पांडव उमरा गावामधील शेतकऱ्यांना पीक पद्धतीवर वाशीमच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ बी. डी. गीते यांनी ऑडियो कॉन्फरन्सद्वारे उपयुक्त माहिती दिली. 

शेतीची कामं आटोपल्यावर शेतकऱ्यांची रात्रीची निवांत वेळ हेरून, यावेळी सर्व जण पुरेपूर उपस्थित राहत असल्यानं या ऑडियो कॉन्फरन्सद्वारे शेतकरी वर्गाला मोठा फायदा होताना दिसत आहे. यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत असल्यानं समाधान व्यक्त होत आहे. शेतकरी आणि कृषी  विभाग यामध्ये बऱ्याच वेळा विचारांचं आदानप्रदान होत नाही. बहुतांश वेळा कृषी विभागामार्फत हे मार्गदर्शनाचे कार्यक्रम दिवसा होत असतात. पण रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून हे मार्गदर्शन रात्रीच्या वेळी दिलं जात असल्यानं शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. त्यामुळं येत्या पुढच्या काळात ही पद्धत शेतकऱ्यांकरता फायदेशीर ठरणार आहे.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.