स्पेशल रिपोर्ट

वर्णेतील तरुण शेतकऱ्याचा उपक्रम

शशिकांत कोरे

सातारा - साताऱ्याजवळील वर्णेगाव येथील राजेंद्र पवार यांनी पारंपरिक शेतीला झुगारून केवळ 10 गुंठे जमिनीतून जरबेरा फुलांचं सहा लाखांचं विक्रमी उत्पादन घेतलं. या युवकाचा हा नवीन प्रयोग बक्कळ पाण्यात पारंपरिक शेती करणाऱ्यांना आदर्शवत असाच आहे. 

 

निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून न राहता राजेंद्र पवार यांनी ग्रीन हाऊस शेतीचा पर्याय निवडला. त्यांनी हायटेक पध्दतीनं ग्रीन हाऊसची रचना केली. त्यामध्ये 38 बाय 34 साईजच्या फुलांच्या रोपांचं बेड तयार केलंय. प्रत्येक चार इंचावर एक रोप याप्रमाणं जरबेराच्या फुलांची लागवड करून ठिबक पध्दतीचा वापर केलाय. 

या रोपांवर नागआळी, भुरी, मर आदी रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेळीच औषध फवारणी करण्यात येते. फुलांचं अधिक उत्पादन मिळण्यासाठी रोप लावल्याच्या 65 दिवसांनंतर येणारी फुलकळी तोडून टाकतात, तर 70व्या दिवसानंतर एक दिवसाआड फुलं तोडणीस सुरुवात होते. साधारणपणे या पध्दतीतून दररोज दोन हजार फुलांचं उत्पादन घेतलं जातं. परंतु राजेंद्रच्या या ग्रीन हाऊसमध्ये दररोज तब्बल तीन हजार जरबेरा फुलांचं उत्पादन घेतलं जातंय.

राजेंद्र या हायटेक शेतीतून दरवर्षी केवळ दहा गुंठ्यांत सहा लाखांपर्यंतचं उत्पादन घेतो. यामध्ये एक लाख 75 हजार रुपये खर्च आणि बॅंकेचा कर्जहप्ता दोन लाख रुपये एवढे देऊनही तब्बल दोन लाख रुपये एवढा निव्वळ नफा तो मिळवतोय. या फुलांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा मोठ्या शहरांत मोठी मागणी आहे. हैदराबाद येथील विजय मर्चंट यांच्याकडून राजेंद्रला इतर बाजारपेठांपेक्षा जास्त दर मिळतो. त्यामुळं इतर बाजारपेठांकडेही त्याचं बारीक लक्ष असतं.

Comments (1)

  • मला राजेंद्र पवार यांचा कॉन्टेक्ट नंबर पाहिजे आहे. मला हा प्रोजेक्ट करायचा आहे.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.