स्पेशल रिपोर्ट

अजिंक्यताऱ्यासाठी तरुणाई सरसावली

शशिकांत कोरे, सातारा
गडकिल्ले हे महाराष्ट्राचं वैभव. परंतु त्याच्याकडं लक्ष द्यायला कुणालाच वेळ नसल्यानं त्यांची पुरती दुर्दशा झालीय. साताऱ्याचा अजिंक्यतारा हा किल्लाही त्यापैकीच एक! मात्र, आता या किल्ल्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी तरूणाईनं पुढाकार घेतलाय. किल्यावरील सात तळ्यांचं  पुनर्भरण करण्याचं काम सध्या जोरात सुरू असून त्यातून वृक्षारोपणासारखी कामं केली जाणार आहेत.
 

Ajikyatara killa intro image bharat4india.comभोजराजाचा अजिंक्यतारा

शिलाहार वंशातील दुसऱ्या भोजराजानं 1190 मध्ये अंजिक्यतारा बांधला. शिवरायांच्या काळात राजगड, रायगड, जिंजी, आणि सातारचा अजिंक्यतारा या राजधानीच्या जागा होत्या. समुद्र सपाटीपासून सुमारे 3300 फुट उंचीवर असणाऱ्या या गडावर छञपती शिवरायांनीही काही काळ वास्तव्य केले होते. छ़ञपती संभाजी महाराजाचे पुञ छ़ञपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेकही याच अजिंक्यताऱ्यावर झाला. तर अशा या ऐताहासिक घटनेचा साक्षीदार असलेल्या या गडावरील बांधकाम कालौघात जीर्ण होऊन नामशेष झाले. परंतु अभेद्य गड आजही दिमाखात उभा आहे. गडावरील तळ्यांची दुर्दशा झाली असली तरी त्यातील झरे आजही जीवंत आहेत.

राज्य सरकारची घोषणा हवेतच

अजिंक्यताऱ्याच्या विकासासाठी राज्य सरकारनं दोन वर्षांपूर्वी सुमारे 10 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. पण पुढं काहीच झालं नाही. त्यामुळंच सातारकरांनी पुढाकार घेत आता हा दुर्लक्षीत किल्ला पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याचं पण केलाय. इथल्या सातही तळ्यांची आणि माजलेलं गवत-झुडपं काढून टाकण्यासाठी तरुणाईनं कंबर कसलीय. कला वाणिज्य महाविद्यालयातील सुमारे 150 विदयार्थी या मोहीमेत सहभागी झालेत.

साततळ्यांमध्ये मोठा जलसाठा

किल्यावर मंगळाई, शिवसागर, सप्तर्षी, कोठी, भवाऩी, दुधबाबी, सागरी सुलतानापीर, अशी सात तळी आहेत. काही तळ्यांत माती गाळ साचला असून त्याचं पुनर्भरण करणं गरजेचं आहे, त्यासाठी आराखडा तयार करण्याचं काम उरमोडी पाटबंधारे विभागातील कर्मचारी करतायंत. गडावर जेसीबी, अन्य मशिनरी कशी नेणार हा यक्ष प्रश्न आहे. परंतु लवकरच याबाबत बैठक घेऊन मार्ग काढला जाणाराय. तळ्यांचं पुनर्भरण झाल्यानंतर त्यातून निर्माण होणाऱ्या पाण्यातून पर्यटकांना पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध होणार आहे. तसंच अजिंक्यतारा वनराईनं बहरून जाणार आहे. गड असला म्हणून काय झालं... जिथं पाणी आहे तिथं जीवन आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.