स्पेशल रिपोर्ट

विद्यार्थीनींनी साकारलीय बँक

प्रवीण मनोहर, अमरावती
शिक्षक सृजनशील असतील तर विद्यार्थ्यांना चांगले संस्कार मिळतात शाळेत मिळालेले संस्कार व्यक्तिमत्व घडवतात. अमरावती जिल्ह्यातील नेर पिंगळाई इथल्या जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेतील शिक्षकांनी शाळेत विद्यार्थीनींचीच बँक उघडलीय. त्यामुळं विद्यार्थीनींना बचतीचं महत्त्व तसंच बँकेची कार्यप्रणालीही समजण्यास मदत होतेय.
 

bankशाळेसमोर गोळ्या-बिस्कीटांच्या विक्री करणाऱ्या आजीबाईंजवळ दुपारच्या मधल्या सुट्टीत मुलींची ही गर्दी होते. तर दुसरीकडं पैशांअभावी सहलीसारख्या उपक्रमात गरीब विद्यार्थीनींना सहभागी होता येत नव्हतं. कुठल्याही शाळेत दिसणारं हे दृश्य या शाळेतही होतं. मात्र, कल्पक शिक्षकांनी त्यावर मात करण्यासाठी ही विद्यार्थीनींच्या बँकेची अभिनय कल्पना शोधून काढली. त्यासाठी शिक्षकांनी सुरवातीला 500रुपये आणी प्रत्येक विद्यार्थीनींने 10रुपये भाग भांडवल म्हणुन जमा केले. शिक्षकांचे 7000 रु. आणी विद्यर्थीनींचे 5000 हजार अशा एकूण 12,000 रुपयांवर ही बँक सुरु झाली. दोन वर्षात बँकेत तब्बल 78,774रुपये जमा झालेत. आता कोणत्याही विद्यर्थीनीला सहलीसाठी, त्यांच्या शालोपयोगी वस्तूंसाठी पालकांना पैसे मागावे लागत नाहीत. शिवाय त्यांचा होणारा वायफळ खर्चही नियंत्रणात आलायं बँकेसोबतच वस्तू भंडारही उघडण्यात आले असून त्यातून बँकेला नफा मिळतो आणी विद्यार्थीनींना रास्त किंमतीत वस्तूही.

बँकेचं संचालक मंडळ विद्यार्थींनींमधुनच निवडलं जातं. गणीतात गती असलेल्या चुणचुणीत मुलीकडं व्यवस्थीपकाची धुरा सोपवली जाते. बँकेच्या दैनदिन कारभार वेळ म्हणजे अर्थातच मधली सुट्टी.

बँकेची चेअरमन असलेली अवंतिका एखाद्या मोठ्या बँकेच्या चेअरमनसारखी बँकेची भूमीका सांगते तर व्यवस्थापक असलेल्या आकांक्षानं बँकेची रोजची कामं कशी चालतात, हे अगदी व्यवस्थाकला शोभेल अशाच थाटात सांगितलं. सातशे रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली तर ती मुख्याध्यापकांकडे जमा केली जाते आणी मुख्याध्यापक ती रक्कम गावातील सेवा सहकारी संस्थेच्या पतपेढीत जमा करतात. यामुळं पैसा आला की जोखीम येतेचं आणि यामुळं 'थेंबेथेंबे तळं साचे' या म्हणीचा अर्थही मुलींना अवगत होतोय.


Comments (5)

  • शालेचा हा अभिनव उपक्रम आहे यामधून VIDHYARTHANA बचातिची सवय लगते.इतर शालेने या शालेची माहिती घेतली पाहिजे, कन्या शालेचे मनापासून अभिनन्दन.

  • प्रविन्दादा चांगल्या उपक्रमाला जगासमोर आन्ल्याबद्दल धन्यवाद्.

  • बैंक मधे असेच पैसे जमा होत राहो या माध्यमातून मुलांची खुप खुप बचत होवो....
    मी विद्यार्थीचे व शिक्षकांचे या बद्दल कौतुक कारतो.

  • सर्वांचे हार्दिक अभिनंनदन! "या उपक्रमाच्या माध्यमातून स्पर्धात्मक अभ्यासक्रम आत्मसात करण्यासाठी मदत होते. विद्यार्थी स्वावलंबी बनतो आणि बचतीची सवय लागते...

  • खुपच आनंदाची बातमी आहे. आशाच प्रकारच्या माध्यमातून मुलाना प्रोत्साहन मिळत रहने गरजेचे आहे. महत्वाची बाब म्हणजे शिक्षकांचा असणारी अटूट मेहनत.आपना सर्वांच अभिनन्दन! आणि सदिछ्या पण. धनयवाद...!
    १!

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.