स्पेशल रिपोर्ट

डॉक्टरकी सोडून फुलवली शेती...

ब्युरो रिपोर्ट, वाशीम
विदर्भामध्ये नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांचं चित्र दिसत असलं, तरी या चित्राला दुसरीही चांगली बाजू आहे हे इथल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी सिद्ध केलंय. त्यांनी या परिस्थितीतही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करून आपल्या शेतीतून चांगलं उत्पन्न घेत आहेत. वाशीम जिल्ह्यातील डोंगर किन्ही गावच्या डॉ. हेमंत देशमुख यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाला रामराम करत लागवड केलेल्या मिरचीच्या पिकातून लाखो रुपयांचं उत्पन्न घेतलंय.
 
 
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगर किन्ही गावात राहणारे डॉ. हेमंत देशमुख यांनी वैद्यकीय पदवी घेतल्यावर काही काळ आपला वैद्यकीय व्यवसाय केला. मात्र आपल्याकडं असलेल्या वडिलोपार्जित 40 एकर शेतीकडं दुर्लक्ष होतंय याची त्यांना खंत वाटत होती. शेवटी ठाम निश्चयानं आपला वैद्यकीय व्यवसाय बंद करून शेतीच्या माध्यमातून काही वेगळं करून दाखवण्याचा त्यांनी ध्यास धरला. काही वर्षांत आपल्या शेतीत उपलब्ध पाण्यात ठिबक सिंचनाचा योग्य वापर करून क्रांती करीत पाच एकर शेतीमध्ये मिरचीचं पीक घेतलं. आजपर्यंत त्यांनी एक हजार रुपये प्रती क्विंटलच्या भावाप्रमाणं ६०० क्विंटल मिरचीची विक्री केलीय. तसंच येत्या काही महिन्यांमध्ये त्यांना ९०० क्विंटल उत्पन्न अपेक्षित असून ते प्रत्यक्षात खरं करून दाखवण्याचा संकल्प त्यांनी केलाय.

mirchi 6योग्य सिंचन आणि योग्य नियोजन केल्यास शेतीव्यवसाय घाट्याचा नसून फायदेशीर ठरू शकतो, हे त्यांनी आपल्या उदाहरणावरून सिद्ध केलंय. मात्र त्याकरता जिद्द आणि चिकाटी आवश्यक आहे, असं प्रयोगशील शेतकरी डॉं. हेमंत देशमुख म्हणाले.

शासनानं विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून काढल्यास डॉ. देशमुखांसारखे नवनवीन प्रयोग करणारे प्रयोगशील शेतकरी उदयास येतील. तसंच शेती कशी फायदेशीर ठरू शकेल, हे आपण राबवलेल्या शेतीतील नवनवीन प्रयोगातून सिद्ध करतील यात शंका नाही. पण त्याकरता खरी गरज आहे, शेतकऱ्यांच्या खचलेल्या मनाला धीर देण्याची.

संपर्कः डॉ. हेमंत देशमुख - 9421746184

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.