स्पेशल रिपोर्ट

एक फेरफटका, गुलाब प्रदर्शनातून!

प्रदिप भणगे, डोंबिवली
फुलांचा राजा कोण? हा प्रश्न विचारल्यास प्रत्येकाला आठवतं ते गुलाबाचं फूल. एकाच ठिकाणी जर हीच गुलाबाची विविधरंगी फुलं पाहायला मिळाली तर... एकदा डोंबिवलीत अशाच गुलाब प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होत. त्यात तब्बल ४०० प्रकारच्या गुलाबांची फुलं होती. आजच्या 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त या होऊन गेलेल्या प्रदर्शनातून फेरफटका मारुया!
 

४०० प्रकारच्या गुलाबांची अनोखी पर्वणी

नुकतंच आंतरराष्ट्रीय स्तराचं गुलाबांचं प्रदर्शन डोंबिवलीत भरवण्यात आलं. या प्रदर्शनात विविध 400 प्रकारचे गुलाब बघायला मिळाले. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी या प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं.
Rose Festival image 2प्रदर्शनात शुधांशू, अभिसारिका, ब्लू ओशियन या भारतातल्या प्रसिद्ध जातीच्या गुलाबांबरोबरच जॉन एफ केनेडी, मॅडम प्रेसिडेंट, जस्ट जॉय, लेडी एक्स या जगप्रसिद्ध जातीचे गुलाबही ठेवण्यात आले होते.

गुलाबांचा राजा कोण?

या रोझ फेस्टिव्हलचं आकर्षण ठरलं गुलाबांच्या स्पर्धेनं. गुलाबांचा राजा, गुलाबांची राणी, प्रिन्स गुलाब आणि प्रिन्सेस हे मान मिळवलेले गुलाब सगळ्याचंच लक्ष वेधून घेत होते.
तर ८०० वर्षं जुनं चीनी गुलाब जातीचं फुलही या प्रदर्शनात ठेवण्यात आलं. ऑल इंडिया रोझ सोसायटीचे अध्यक्ष बी. एस. ठिपसे यांनी या रोझ फेस्टिव्हलचं उद्घाटन केलं.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.