स्पेशल रिपोर्ट

चल रे भोपळ्या... टुणूक, टुणूक!

मुश्ताक खान, रत्नागिरी
कोकणात काकडी, मिर्ची, काजू, तांदूळ या नेहमीच्या प्रचलित पिकांऐवजी लाडघरच्या प्रसाद बाळ यांनी नावीन्याचा ध्यास घेत तब्बल अडीच एकरावर भोपळ्याचं पीक घेऊन भरघोस उत्पन्न मिळवलंय. त्यामुळं आजीबाईंचा टुणूक टुणूक चालणारा भोपळा कोकणच्या लाल मातीतही रुजतो, हे स्पष्ट झालंय. नजीकच्या काळात कोकणात भोपळ्याची लागवड वाढेल, असा विश्वासही त्यांना वाटतोय. हा आदर्श घेऊन कोकणातल्या इतर शेतकऱ्यांनी जर भोपळ्याची लागवड केली, तर त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा पक्का निर्धार बाळ यांनी केलाय.
 
 

नोव्हेंबरमध्ये केली पेरणी
पुण्यात भोपळ्याची शेती पाहिल्यानंतर रत्नागिरीजवळच्या लाडघर इथल्या प्रसाद बाळ यांना आपल्यालाही शेतात भोपळा घ्यावा असं वाटू लागलं. त्यानुसार त्यांनी या पिकाची माहिती घेण्यास सुरुवात केली. कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कलिंगड किवा काकडीच्या तुलनेत थंडीत येणारा हा भोपळा चार पैसे जास्त देऊ शकतो, असं लक्षात आलं. यानंतर आपण भोपळ्याचीच लागवड करायचीच, असा निश्चय मनाशी करून ला़ड यांनी अडीच एकरावर महिको कंपनीचं 'एमपीएच-1' हे संकरीत बियाणं लावलं. नोव्हेंबरमध्ये पेरणी केल्यानंतर सध्या या वेलींना मोठमोठे भोपळे लागलेले दिसताहेत.


bhplaहेक्टरी साडेतीन लाखांचं उत्पादन
या भोपळ्याच्या शेतीबाबत प्रसाद बाळ यांनी 'भारत4इंडिया'ला सांगितलं, की भोपळ्याच्या लागवडीसाठी कृषी विभागानं 50 टक्के अनुदानावर प्लास्टिक मल्चिंगची व्यवस्था करून दिली. भोपळ्याच्या पिकाची योग्य काळजी घेतली तर एकरी १४ आणि हेक्टरी ३५ टनांपर्यंत उत्पादन मिळू शकतं. बाजारात भोपळ्याच्या किमतीत चढउतार होत असतात म्हणून मी मुंबईच्या एका कंपनीशी १० रुपये प्रती किलोचा करार केला आहे. लाडघरमध्ये जेवढं उत्पन्न होईल, तेवढा भोपळा खरेदी करण्यास ही कंपनी तयार आहे. त्यामुळं केवळ 3 महिन्यात हेक्टरी साडेतीन लाख रुपये सहज मिळवता येऊ शकतात. भोपळ्याच्या शेतीच्या खर्चाबद्दल सांगायचं झालं तर यासाठी उत्पन्नाच्या ३० टक्केचं खर्च येतो. त्यामुळं भोपळा हे पीक सर्व बाजूंनी फायदेशीरच आहे. कोकणातल्या इतर शेतकऱ्यांनीही जर भोपळ्याची लागवड केली, तर त्यांनाही मी बाजारपेठ मिळवून देईल, असं आश्वासन बाळ यांनी दिलं आहे.


तरुणांना प्रोत्साहन देणार
लाडघरमध्ये बाळ यांचा हा भोपळा शेतीचा प्रयोग पंचक्रोशीतील अनेक तरुणांना इथं आणून दाखवणार आहोत, असं पंचायत समितीचे कृषी अधिकारी उमेश भागवत यांनी सांगितलंय, तर कोकणात घेण्यात येणाऱी मिरची, वांगी ही पिकं नाशवंत आहेत. पण भोपळा नाशवंत नाही. जर भोपळ्याला योग्य भाव मिळाला नाही तर त्याची साठवणूकही करता येऊ शकते. त्यामुळं शेतकऱ्यांनी अशी पिकं जास्तीत जास्त घ्यावी, असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलंय.


vlcsnap-2013-02-10-16h22m10s25.pngकृषी विभागही घेणार पुढाकार
सध्या झपाट्यानं बदलत असलेल्या हवामानाचा परिणाम आंब्यावर होतोय. आंब्याबरोबरच काजू, नारळ, सुपारी आदी पिकांसोबतच शेतकऱ्यांनी भाजीपाल्याकडंही लक्ष द्यावं. त्यातूनही चांगलं उत्पन्न मिळू शकतं, ही बाब निदर्शनास आणून भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वेगवेगळ्या भाज्या पिकवल्या पाहिजेत, वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत. त्यासाठी आम्ही कायम मदतीला उभे आहोत, कृषी विभाग यासाठी कटिबद्ध आहे असा शब्द दापोलीच्या कृषी अधिकाऱ्यांनी दिलाय.


परदेशात भरतो भोपळा महोत्सव
ग्रीक भाषेत भोपळ्याला पीपॉन म्हणतात. तिथूनच इंग्रजीतल्या पंपकीन या शब्दाची निर्मिती झाली. पीपॉनचा अर्थ मोठा लिंबू असा होतो. भोपळा हे अमेरिकेतलं सर्वात लोकप्रिय पीक आहे. परदेशात तर भोपळा महोत्सव मोठ्या उत्साहात भरवला जातो. कोणाचा भोपळा मोठा यावर बक्षिसही दिलं जातं. आपल्याकडंही जर अशा प्रकारचे महोत्सव भरवण्यात आले तर कोकणातला शेतकरीही भाजीपाला लागवडीकडं नक्कीच आकर्षित होईल.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.