स्पेशल रिपोर्ट

मराठी मातीत रुजतंय कडकनाथाचं वाण!

ब्युरो रिपोर्ट, सावेडी, नगर
एका कोंबडीमागं मिळतात तब्बल 5,000 रुपये आणि एका अंड्याचा भाव आहे तब्बल 75 रुपये... हा काही कुठल्या फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या कोंबडीचा भाव नाही, तर हा दर मिळतोय 'कडकनाथ' जातीच्या कोंबडीच्या वाणाला! मूळ मध्य प्रदेशातील आदिवासी भागातील हे वाण आता महाराष्ट्राच्या मातीतही रुजायला लागलंय. त्याचं मार्केटींगही आता चांगलं होतंय. ठिकठिकाणच्या धाब्यांवर कडकनाथ चिकन मिळेल, असा बोर्ड वाचायला मिळतो. त्यामुळं बऱ्याच जणांना 'कडकनाथ' ही काय भानगड, असा प्रश्न पडतो. आपण जाणून घेऊया...
 


माहिती घेऊन सुरू केला व्यवसाय

'कडकनाथ'ची ख्याती ऐकूनच मग नगरच्या शिवाजी सानप यांनी या कोंबड्यांची पैदास करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी काही पिलं मागवली, ती वाढवली, आणि आता प्रायोगिक तत्त्वावर चालवलेला हा प्रयोग. सुरुवातीला या प्रयोगाला गावातूनही विरोध झाला. मात्र आता याला चांगला प्रतिसाद मिळतोय, असं शिवाजी सानप यांनी सांगितलं. शिवाय मळलेल्या वाटा सोडून नवं काहीतरी शेतकऱ्यांनी करायला हवं, असा सल्लाही सानप इतर शेतकऱ्यांना देतात. राहुरीजवळच्या त्यांच्या फार्म हाऊसवर आता मोठ्या प्रमाणात कडकनाथ कोंबडीचा हा व्यवसाय करण्याचं प्लानिंगही त्यांनी सुरू केलंय.

 


Kadaknath Hen 7मध्य प्रदेशातलं कोंबडीचं वाण

मध्य प्रदेशातल्या झांबुआ जिल्ह्यातील हे मूळ वाण... मध्य प्रदेशातल्या आदिवासी भागात पर्यटनासाठी जाणाऱ्या अनेकांनाही याची माहिती नसायची. कारण आदिवासी संस्कृती तशीही फारशी उजेडात आलेली नाहीच. त्याच संस्कृतीचं 'कडकनाथ' वाण हा एक भाग. या कोंबडीच्या मांसाचा रंग लालसर, काळा असतो म्हणून हिचं नावं 'कालामासी' असंही पडलंय. काळं असलं तरी खायला जबरदस्त रुचकर असं हे चिकन आहे.

 


आरोग्यदायी 'कडकनाथ'ला जगभरातून मागणी

त्यातल्या नराचं वजन दीड ते दोन किलो भरतं आणि मादीचं वजन साधारण सव्वा किलोपर्यंत भरतं. इतर कोणत्याही मांसामधल्या कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणापेक्षा कडकनाथच्या मांसात ते प्रमाण 32 टक्क्यांनी कमी असतं. त्यामुळंच त्याला जगभरातून मागणी वाढत आहे. शिवाय या कोंबडीच्या मांसात 20 टक्के प्रथिनं जास्त असल्याचेही निष्कर्ष पुढे आले आहेत. अनेक जुनाट आजारांवरही या कोंबडीच्या मांसामुळं चांगला फायदा होतो, असं अनेक रुग्ण सांगतात. अर्थात, या सगळ्या अनुभवसापेक्ष प्रतिक्रिया असल्या तरी, कडकनाथचा बोलबाला चांगलाच वाढतोय.

 


Kadaknath Hen 3देखभालीसाठीही कमी खर्च

एकदा लस दिल्यानंतर ठराविक वेळी स्वच्छता आणि पाण्याची सोय असेल, तर दुसरा कुठलाही खर्च या कोंबड्यांच्या देखभालीसाठी येत नाही. शिवाय शेतातील टाकाऊ पदार्थ, उरलेलं, खराब झालेलं धान्य, असं कुठलंही खाद्य या कोंबड्यांना चालतं. शिवाय त्यांची प्रतिकारशक्तीही चांगली आहे. कडकनाथच्या अंड्यांचा वापर डाएट अंडी म्हणूनही केला जातो.

 


उत्पन्नाचं चांगलं माध्यम

अशी ही कडकनाथ कोंबडी, शेतकऱ्यांसाठी केवळ पैदासीचा पर्यायच नाही, तर उत्पन्नाचं एक चांगलं माध्यमही बनू शकते. सध्याच्या वडगाव गुप्ता इथं अगदी छोट्या प्रमाणात या कडकनाथ कोंबड्यांची पैदास करण्यात आलीय. त्यांची संख्या आणि मिळणारा प्रतिसाद पाहता, आता मोठा पोल्ट्री फार्म करण्याचीही तयारी शिवाजी सानप यांनी चालवलीय.

 


Kadaknath Hen 6कडकनाथ कोंबडीचे फायदे

आरोग्यासाठी हितकारक, किडनी, रक्ताचा कर्करोग, हृदयरोग, दमा, त्वचेचे विकार यासाठी हे मांस गुणकारी असल्याचं सांगितलं जातंय. शिवाय शरीरातल्या अॅमिनो अॅसिड योग्य प्रमाणात ठेवण्याचं कामही चांगल्या रीतीनं होतं आणि रक्तातल्या हिमोग्लोबिनचं प्रमाणही चांगलं वाढतं, असा निष्कर्ष पुढं आलाय. शिवाय या कोंबड्यांना विशेष किंवा अतिदेखभालीची गरज नसून कोंबड्यांची प्रतिकारशक्तीही चांगली आहे.

 

 

 

अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचा पत्ता


शिवाजी सानप, झोपडी कॅण्टीनजवळ, सावेडी, अहमदनगर
मोबाईल नंबर- 9975663974 

 

 

Kadaknath Hen 4Kadaknath Hen 5Kadaknath Hen 1

 


Comments (2)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.