स्पेशल रिपोर्ट

जव्हारच्या आदिवासींसाठी खोचला पदर

ब्युरो रिपोर्ट, जव्हार, ठाणे
 
Pragati Pratishthan 27.png'प्रगती प्रतिष्ठान'ची स्थापना
दुर्गम भागातील आदिवासींसाठी पहिल्यांदा गरज होती, ती प्राथमिक आरोग्य सेवांची. सुनंदाताईंनी त्यासाठी 1980 मध्ये प्रगती प्रतिष्ठानची स्थापना करून जव्हार परिसरातील आदिवासींच्या आरोग्यासाठी काम सुरू केलं. या कामानं चांगली गती घेतल्यानंतर त्यांनी आदिवासी मुलांच्या शिक्षणाकडं लक्ष केंद्रित केलं. जव्हारमधील मुलांना शिक्षणासाठी दूरवर जायला लागू नये, त्यांची स्थानिक ठिकाणीच सोय व्हावी, या उद्देशानं त्यांनी 10वीपर्यंतची शाळा सुरू केली.

pragati 4कर्णबधिरांसाठीही शाळा
शिक्षण क्षेत्रात काम करताना त्यांना कर्णबधिर मुलांकडं लक्ष देण्याची गरज तीव्रतेनं जाणवू लागली. ऐकूच येत नसल्यानं कर्णबधिर मुलं शिक्षणाला पारखी होत होती. ही परिस्थिती केवळ आदिवासी पाड्यांची नव्हती तर मोठमोठ्या शहरांमधील कर्णबधिर मुलांचीही अशीच वाईट परिस्थिती होती. ही सामाजिक गरज ओळखून त्यांनी 1995 मध्ये केवळ 14 कर्णबधिर मुलांना घेऊन शाळेची सुरुवात केली. आज पाच ते 18 वयोगटातील तब्बल 70 विद्यार्थी या शाळेत शिकतायत. कर्णबधिर विद्यार्थ्यांना फक्त शालेय शिक्षण न देता व्यावसायिक प्रशिक्षणसुध्दा शिकवलं जातं. शालेय शिक्षणाबरोबरच येथील मुलं गणेशमूर्ती बनवणं, वारली चित्रं रेखाटणं असे रोजगाराभिमुख उपयुक्त उपक्रम राबवले जातात. यामुळं आता मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू लागल्यानं आदिवासी भागाचीही प्रगती झालीय.

pragati 2जव्हार – मोखाडा विजेनं उजळला
आदिवासी भागाचा चिरस्थायी विकास घडवण्याचा ध्यास त्यांनी घेतलाय. कुठल्याच अडचणींवर वरवरची मलमपट्टी करण्यात सुनंदाताईंना रस नसतो. असं काम करा ज्यातून तो प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असं त्यांचं सांगणं असतं. त्यांचं कार्यही त्याच दिशेनं सुरू असतं. त्यातूनच आदिवासी पाड्यात उजेड आणण्यासाठी त्यांनी सौरऊर्जा प्रकल्प हाती घेतलाय. ज्या पाड्यांपर्यंत वीज पोहोचलेली नाही तिथल्या घराघरांत सौरऊर्जेवर चालणारा एक लाईट आणि एक कंदील देण्याचा उपक्रम सुरू आहे. यातून गेल्या तीन वर्षांत सुमारे चार हजार घरांना त्यांनी प्रकाशित केलंय. विशेष म्हणजे, हे लाईट घराघरात बसवण्याचं काम त्यांच्याच कर्णबधिर शाळेतील सात मुलंच करतात. या सौरऊर्जेवरील उपकरणांच्या देखभालीचं कामही हीच मुलं करतात. याशिवाय गेल्या चार वर्षांत 550 पथदिवेही त्यांच्या संस्थेनं बसवलेत.

pragati 1सोलरपंपामुळं श्रम आणि वेळेची बचत
आदिवासी महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागायची. काही महिलांना तर हंडाभर पाण्यासाठी अडीच किलोमीटरच्या डोंगररांगेतून पायपीट करावी लागायची. यामुळं त्यांच्या आरोग्याचे प्रश्न तर निर्माण व्हायचेच. याशिवाय त्यांना कुटुंबासाठीही पुरेसा वेळ देता येत नसे. यामुळंही अनेक सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा ध्यास घेतला. त्यातूनच गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ज्या विहिरीवरून होतो तिथंही त्यांनी सोलरपंप बसवलाय. त्यामुळं वीज असो वा नसो, ठरलेल्या वेळेत आदिवासी पाड्यांना नळपाणीपुरवठा होतो. यामुळं आदिवासींचे श्रम आणि वेळेचीही बचत झालीय. शिवाय अनेक प्रश्नही सोपे झालेत.

Pragati Pratishthan 23.pngशेतकऱ्यांचीही सोय
शेतीसाठीच्या पाण्यासाठीही सौरऊर्जेचे पंप वापरण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना उद्युक्त केलंय. आज अनेक शेतकऱ्यांनी त्याची अमलबजावणी केलीय. त्यामुळं पाण्याची बचत होऊ लागलीच, शिवाय त्याचं नियोजन करणंही शक्य झाल्यानं शेती उत्पन्नातही चांगलीच भर पडलीय. शिवाय शेतकरी बचत गटाचीही स्थापना केलेली आहे.

Pragati Pratishthan 33.pngमहिला बचत गटाची स्थापना
गावातील महिलांसाठी सुनंदाताई गेली 12 वर्षं बचत गट योजना राबवत आहेत. त्यानिमित्तानं गावातील महिलांचं विशिष्ट वेळी एका ठिकाणी एकत्र येणंही सुरू झालंय. महिलांची साठलेली रक्कम गोळा करणं, मग ती बॅंकेत जमा करणं अशी कामं आता महिला स्वतंत्रपणं करताहेत. संस्थेतर्फे बायोगॅस प्रकल्प, गांडूळ शेती, वीटभट्टी आदी उपक्रमांमधून त्यांनी आदिवासी महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून दिलाय. एवढं काम करूनही त्या त्याचा आव आणत नाहीत. या कामासाठी अजूनही अनेक हातांची गरज आहे, असं सांगून तरुणाईला सामाजिक काम करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.