पतीला मदतीचा हात
सरिताताईंची ही कथा. गावात हाताला काम नसल्यानं त्यांचे पती राजाराम दुधगावाहून आपल्या कुटुंबकबिल्यासह चोहट्ट्याला आले. मोठ्या भावाचं पंक्चर दुरुस्तीचं टपरीवजा दुकान होतं. राजाराम या दुकानात काम करायला लागले. पुढे मोठ्या भावानं दुसरीकडं दुकान थाटलं आणि ही टपरी राजारामच्या हवाली केली. राजारामना कामात मदत म्हणून पत्नी सरिता त्यांना मदत करायला लागल्या. पहिल्यांदा सायकल, मोटरसायकलपासून सुरुवात केली. आज ट्रॅक्टर असो की, ट्रक सरिताताई सहजपणं मोठमोठी चाकं उचलतात. त्यातील ट्यूब तपासतात. पंक्चर असल्यास काळजीपूर्वक दुरुस्त करतात.
रांगड्या कामातही सक्षम
वाहन दुरुस्ती हे तसं जोखमीचं पुरुषी काम. जास्त मेहनतीचं म्हणून या व्यवसायात महिला दिसत नाहीत. गावात शेतीवरची कामं वगळता फार झालं तर धुणीभांडी करणं ही कामगार महिलांची कामं. मात्र त्या कामाकडं न जाता सरिताताईंनी आपल्या पतीच्या व्यवसायातच मदत करायचं ठरवलं. रोडलाईनमधील हा व्यवसाय करताना दुकानावर येणारा माणूस कसा असेल याचा अंदाज नाही. मात्र, सरिताताई आपलं काम सक्षमपणं करतात. त्यामुळं कुणाची तक्रार नसते. उमेश वडाळ हे गेली पंधरा वर्षांपासून ट्रॅक्टर चालवतात. गेल्या बारा वर्षांपासून ते या दुकानावर येतात. त्यांची काम सरिताताई फार व्यवस्थितपणं करतात, काळजीपूर्वक करतात, अशी त्यांच्या कामाची पावतीही त्यांना ग्राहकांकडून मिळते.
सोबतीनं मिळकतीत भर
आपली पत्नी आपल्या कामात मदत करीत असल्यानं आपल्या मिळकतीत फार भर पडल्याचं राजाराम सांगतात. कधीही वाहनचालक आले तर आम्ही दोघं मिळून काम करतो. कुणाच्या गाडीचं चाक कधी पंक्चर होईल सांगता येत नाही. कधी अर्ध्या रात्रीही काम येतं. तेव्हा कुठलाही कंटाळा न करता आपली पत्नी आपल्यासोबत असते, याचा त्यांना अभिमान वाटतो. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यावरही केवळ एका महिन्यातच सरिताताई कामाला लागल्याचं पती राजाराम कौतुकानं सांगतात. बायकोचं तोंड भरून कौतुक करताना पत्नीच्या या हिंमतीचा आपल्या नातेवाईकांना अभिमान असल्याचं सांगतात.
कुटुंब पंक्चर होऊ नये म्हणून
गोंदियाच्या भागरताबाईंची कथा जरा वेगळीच आहे. पतीच्या पश्चात कुटुंब पंक्चर होऊ नये म्हणून त्यांनी पतीचं पंक्चर काढण्याचं दुकान सुरू केलं. सुरवातीला त्या या कामात पतीला हातभार लावत होत्या. मात्र त्या ऐन पंचविशीत असताना पतीला लकवा झाल्यामुळं दुकानाची संपूर्ण जवाबदारी त्यांच्या डोक्यावर येऊन पडली. पण पुढे दीर्घ आजारात त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. ऐन जवानीत संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी भागरताबाईंच्या डोक्यावर पडली. यात त्यांची लहान मुलं होती. चूल आणि मूल सांभाळायचं कसं, हा प्रश्न पुढं आ वासून उभा होता. या संकटातूनही स्वतःला सावरत, मोठ्या धीरानं त्या पंक्चर दुरुस्तीच्या कामाला लागल्या. या व्यवसायातून केलेल्या कमाईच्या आधारानं आपल्या मुलांना मोठं केलं. आपल्या पंक्चरच्या व्यवसायातून त्यांनी मुलांचं शिक्षण पूर्ण करून त्यांची लग्नही लावून दिली. भागरताबाई यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलींची लग्न झाली असून मोठा मुलगा एम्.एस.ई.बी. करत आहे.
पासष्टीतही उमेद कायम
मागीच्या वर्षी दुकान बंद करून घरी जात असताना त्यांचा अक्सिडेंट झाला, तेव्हापासून चार महिने खाटेवर काढल्यानंतर पुन्हा त्या नव्या जोमानं आपल्या कामाला लागल्या आहेत. आज भागरताबाईंच्या वयानं पासष्टी गाठली असून, आता अशक्तपणाही जाणवतोय. तरीही ही माय कुटुंबासाठी हातात पंक्चर काढायची साधनं घेऊन पंक्चर दुरुस्त करायच्या कामानं आपला उदरनिर्वाह करीत आहे.
कुठलंही काम असो. त्यात कमीपणा न धरता त्याचं साधन म्हणून उपयोग करत साध्य मिळवता येतं हे सरिता वानखडे आणि भागरताबाई फुंडे या दोघी रागिणींनी आपल्या पतीच्या कामात हातभार लावता लावता संपूर्ण कुटुंबाची जबाबदारीही आपल्या खांद्यावर धीरानं पेललीय. अशा या रणरागिणींना 'भारत4इंडिया'चा सलाम.