स्पेशल रिपोर्ट

साकारतोय... शिल्पकार चरित्रकोश!

राहुल रणसुभे, मुंबई
आधुनिक भारतीय दृश्यकलेच्या इतिहासात महाराष्ट्राच्या चित्र-शिल्प परंपरेचं योगदान अभूतपूर्व आहे. त्याची माहिती नवीन पिढीला व्हावी, या उद्देशानं 'शिल्पकार चरित्रकोश' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकाराला येतोय. यातील सहाव्या दृश्यकला खंडाचं प्रकाशन मुंबईत झालं. या चरित्रकोशात महाराष्ट्रातील तीनशेहून अधिक चित्रकार, शिल्पकार, उपयोजित कलाकार, तसंच व्यंगचित्रकारांचा समावेश आहे. त्यांच्या अभूतपूर्व कलाकृतींसाठी ७२ पानांचा चित्र विभाग या खंडात देण्यात आलाय. त्यात यापूर्वी प्रकाशित न झालेली दुर्मिळ चित्रं आहेत. त्यामुळंच हा खंड म्हणजे महाराष्ट्राच्या कलेचा दस्तऐवजच आहे.
 

  

vlcsnap-2013-05-09-20h30m42s81.png

 


IMAG1870कोणत्याही विषयांचा खोलवर अभ्यास करायचा झाला तर एकच शब्द समोर येतो तो म्हणजे कोश
. या कोशांमध्ये त्या विषयाच्या उगमापासूनच्या घडामोडींची सविस्तर माहिती असते. परंतु अशा प्रकारचे कोश सर्वच विषयांचे मिळतील, असं नाही. त्यातल्या त्यात चित्रकला, शिल्पकला यांच्याबाबतच्या कोशाचा तर प्रश्नच येत नाही. परंतु महाराष्ट्राचं हे लेणं नवीन पिढीपर्यंत पोहोचवायला पाहिजे, ही गरज लक्षात घेऊन 'साप्ताहिक विवेक' आणि 'हिंदुस्थान प्रकाशन संस्था' यांनी या चरित्रकोशाच्या निर्मितीची संकल्पना हाती घेतलीय. एकूण १२ खंडांचा हा प्रकल्प असून त्यातील दृश्यकला खंड हा सहावा आहे.

  

कलाकार निवडीचे निकष

या खंडातील कलाकारांच्या निवडीसाठी काही निकष लावण्यात आले होते. यामध्ये कलाकारानं आपल्या कारकिर्दीची किमान पंचवीस वर्षं पूर्ण केलेली असावीत अथवा कलासंचितात महत्त्वाची भर घातलेली असावी. ज्यांचा जन्म महाराष्ट्रातला आहे, पण कार्यक्षेत्र महाराष्ट्राबाहेर आहे किंवा ज्यांचा जन्म परप्रांतातला आहे, पण त्यांची बरीचशी कारकीर्दच महाराष्ट्रात घडलेली आहे, अशा कलावंतांचाही यात समावेश यात आहे. या दृश्यकला खंडाबाबत बोलताना ज्येष्ठ चित्रकार आणि चरित्रकोशाचे मुख्य संपादक सुहास बहुलकर यांनी सांगितलं, की या खंडात दोनशे वर्षांतील महाराष्ट्रातील ३०५ कलाकारांचा समावेश आहे. महाराष्ट्राला चित्रशिल्पकलेची मोठी परंपरा लाभली असून याबाबत कुठलीच माहिती सापडत नव्हती. त्यामुळं आपले चित्रकार-शिल्पकार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचू शकले नाहीत. ते जर व्हायचं असेल तर त्याबाबतच्या माहितीचं संकलन होणं गरजेचं होतं. आता या खंडाद्वारे प्राथमिक माहितीचं संकलन झालंय. याचं हिंदी आणि इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याचा मानस आहे. जर हे काम योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचलं तर आपल्याकडील कलावंतांची माहिती भावी कलावंतांनाच नाही तर लोकांनाही मिळेल.

 


दृश्यकला खंड चरित्रकोशाचं स्वरूप

या खंडाच्या सहसंपादिका सुपर्णा कुलकर्णी यांनी सांगितलं, की या चरित्रखंडात मागील २०० वर्षातील ३०५ चित्रकार, शिल्पकार, उपयोजित कलाकारांचा समावेश आहे, तर ९०० पृष्ठसंख्या असलेल्या या खंडात ८०० कृष्णधवल फोटो आणि चित्रं छापली आहेत, तर १०८ bookपानांच्या कलासंचित या रंगीत चित्रांचाही समावेश आहे. खंडामध्ये प्रस्तावना, इतिहासाच्या पाऊलखुणा या प्रकारचे काही महत्त्वाचे टप्पे आहेत. यामुळं महाराष्ट्राच्या कलेचा इतिहास वाचकांसमोर योग्य प्रकारे उलगडत जातो. या खंडातील माहितीच्या विश्वासार्हतेसाठी महाराष्ट्रातील ७० मोठ्या कलाकारांनी याचं लेखन केलंय. महाराष्ट्र ज्यांची जन्मभूमी किंवा कर्मभूमी आहे अशा जवळपास ३०५ कलाकारांची माहिती या चरित्रखंडामध्ये आहे. यामध्ये चित्रकार गंगाराम नवगीरे तांबट, वा. घो. कुलकर्णी, तैयब मेहता यांसारखे अत्यंत महत्त्वाचे चित्रकार हे त्यांच्या दुर्मिळ चित्रांसोबत आपल्याला या खंडामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर शिल्पकारांमध्ये करमरकर, गणपतराव म्हात्रे यांच्याही चरित्रांसोबत त्यांच्या शिल्पांचे फोटो या खंडामध्ये आहेत. याशिवाय या कलाकारांच्या जीवनातील चढउतार त्यांच्यावर ओढावलेली परिस्थिती या सर्वांचं यथार्थ चित्रण या चरित्रांमध्ये केलेलं आहे. या खंडामध्ये चित्रकार, शिल्पकारांसोबतच आधुनिक तंत्रज्ञानामुळं निर्माण झालेलं क्षेत्र, उपयोजित कला यामधीलही कलाकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. अमुलची जाहिरात, किसानची जाहिरात अथवा फिल्मफेअर पुरस्काराच्या स्मृतिचिन्हाची (मोमेंटो) निर्मिती कशी झाली, या सर्वांची सविस्तर माहिती या चरित्रखंडात आहेत. व्यंगचित्राचा विभाग, हे याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. या विभागाची संपूर्ण जबाबदारी प्रख्यात व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांनी सांभाळली. तर या पुस्तकातील कलासंचित या रंगीत विभागात असणाऱ्या कलाकृतींची छायाचित्रं औंध, सांगली, सातारा, नागपूर, कोल्हापूर येथील प्रसिद्ध ऐतिहासिक संग्रहालयातून घेण्यात आलीत. काही काही छायाचित्रांसाठी परवानगी मिळवण्यासाठी आम्हाला तब्बल सहा महिने वाट पाहावी लागली.

 drushkala

...असा आहे शिल्पकार चरित्रकोश!

'शिल्पकार चरित्रकोश' हा प्रकल्प तीन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आला. यामध्ये ज्यांनी महाराष्ट्र घडवला अशा एकूण पंचवीस विषयांतील ५००० लोकांची चरित्रं १२ खंडांमध्ये येणार आहेत. जवळपास ३०० तज्ज्ञ या प्रकल्पावर काम करत असून १८ संस्था या प्रकल्पाला जोडल्या गेल्या आहेत. 'दृश्यकला खंड' हा या साखळीतील सहावा खंड आहे. सुरुवातीला 'इतिहास खंड' प्रकाशित झाला असून यात महाराष्ट्राच्या उत्पत्तीपासून १८व्या शतकापर्यंतचा महाराष्ट्राच्या इतिहासाचा आढावा घेण्यात आलाय. दुसरा खंड साहित्यावर आधारित असून त्यात मागील २०० वर्षांतील साहित्यातील घडामोडींचा आढावा घेण्यात आलाय. तिसऱ्या खंडात विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रातील चरित्र नायकांचा आढावा घेण्यात आलाय. चौथा खंड प्रशासन, न्यायपालिका आणि संरक्षण या विषयावर, तर पाचवा खंड कृषी आणि सहकार या विषयावर आधारित आहे. आणि सहावा दृश्यकला, चित्रकला आणि उपयोजित कला या विषयांवर आधारित आहे. प्रसिद्ध होणाऱ्या पुढील सहा खंडांमध्ये उद्योग आणि अर्थकारण खंड, राजकारण-समाजकारण खंड, पत्रकारिता, तत्त्वज्ञ आणि प्राच्यविद्या खंड, क्रीडा, धर्म- अध्यात्म खंड, आरोग्य आणि नाटक, चित्रपट यांचा समावेश आहे.

 

हे खंड मिळवण्यासाठी प्रभादेवी इथल्या 'साप्ताहिक विवेक'च्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलंय. 

 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.