स्पेशल रिपोर्ट

पेणच्या सुबक मूर्तींनी सजल्या बाजारपेठा!

ब्युरो रिपोर्ट, रायगड
घराघरात विराजमान होण्यासाठी बाप्पांच्या मूर्तींनी बाजारपेठा भरुन गेल्यात. 'पेणच्या सुबक मूर्ती' असे फलक सर्वत्रच पहायला मिळतायत. कसबी कारागीर आणि नैसर्गिक वाटावं, असं रंगकाम यामुळं पेणच्या मूर्ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचं प्रतीक झाल्यात. पेणमधून यावेळी 30 लाखांच्यावर मूर्ती तयार झाल्या असून विक्रीसाठी त्या राज्यात तसंच विदेशातही रवाना झाल्यात. यातून यंदाची उलाढाल 40 ते 45 कोटींच्या घरात जाईल, असा अंदाज आहे.
 
Untitled-1 copy

30 लाख गणेशमूर्तींची निर्मिती
पेण आणि परिसरातील सुमारे साडेसहाशे कारखान्यांमधून यंदा जवळपास 30 लाख गणेशमूर्ती
तयार झाल्यात. त्यातून अंदाजे ४५ कोटींची उलाढाल होऊन जवळपास तीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती गणेश मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी दिली. इथं तयार झालेल्या मूर्तींपैकी ६० टक्के गणेशमूर्ती राज्याबाहेर रवाना झाल्यात. याशिवाय म़ॉरिशस, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांमध्ये २० हजारहून अधिक मूर्ती रवाना झाल्याचंही देवधर यांनी सांगितलं.

गणेश संग्रहालय

पेण शहरात गणेश भक्तांची आणि पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. पेण नगरपालिकेनं 2009 रोजी श्रीगणेश संग्रहालय निर्माण केलं असून अल्पावधितच ते अत्यंत लोकप्रिय झालंय. या संग्रहालयात शाडू, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनविण्याचे साचे, गणेशाच्या विविध आकाराच्या असंख्य मूर्त्यांची अत्यंत सुबकपणे मांडणी करण्यात आलीय. त्याबरोबरच पेणमधील मान्यवर मूर्तीकारांची माहिती, छायाचित्रे विविध वृत्तपत्रांमधून प्रसिध्द झालेले विशेष लेख, त्यांची कात्रणे, विविध मान्यवर व्यक्तींनी संग्रहालयास दिलेल्या भेटींची छायाचित्रे आहेत.


पेणपाठोपाठ आता नगरचा नंबरvlcsnap-2013-09-06-17h08m42s84
बाप्पांच्या मूर्ती तयार करण्यात पेणपाठोपाठ आता नगर शहराचा क्रमांक आहे. सध्या नगर शहर आणि परिसरात सुमारे 300 छोटय़ा-मोठय़ा कारखान्यांमधून गणेशमूर्ती बनतात. यातील ३५ ते ४० कारखाने वर्षभर चालतात, तर बाकीचे कारखाने हंगामी आहेत. बहुतांशी कारखाने नेप्ती व वारूळाचा मारूती परिसरात आहेत. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, आंध्रप्रदेशचे व्यापारी जूनच्या सुरुवातीला नगरमध्ये येऊन मूर्तीची ऑर्डर देतात. गेल्या तीन वर्षांपासून येथील मूर्ती पुण्या-मुंबईचे ठोक व्यापारी खरेदी करीत आहेत. त्यांच्यामार्फत रोहोकले व कोडम यांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती गेल्या वर्षांपासून परदेशी जातात. साधारणपणे एक ते दीड फूट उंचीच्या मूर्ती परदेशी नागरिक खरेदी करतात.

याशिवाय प्रत्येक तालुक्याच्या तसंच जिल्ह्याच्या ठिकाणीही अनेक मूर्तीकार काम करत असतात. गावगाड्यातील टिकून असलेल्या कुंभारवाड्यांमधूनही मोठ्या प्रमाणात मूर्त्या तयार होतात. परंतु मुंबई, पुण्यासह इतर मोठ्या शहरांमधील बाजारपेठत लखलखाट आहे तो पेणच्याच मूर्तींचा!

 

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.