स्पेशल रिपोर्ट

जाई-जुई, शेवंती, कमळ, गुलाब, कण्हेरी !

सुमित बागुल, मुंबई
गणपती आता तोंडावर आले असून अवघ्या मऱ्हाटी मुलखातील बाजारपेठा त्यासाठी सज्ज झाल्यात. सजावटीच्या साहित्यापासून ते लाईटच्या माळांपर्यंत आणि अगरबत्तीपासून ते दुर्वा-फुलांपर्यंतच्या पूजासाहित्यानं बाजार खचाखच भरून गेलाय. फुलबाजाराचं तर विचारूच नका. सायली, जाई, जुई, मोगरा कमळ, सोनचाफा, झेंडू, जास्वंदी, शेवंती, गुलाब, कण्हेरी अशा फुलांनी बाजार बहरलाय. याशिवाय दुर्वा, तुळस, शमी, तेरडा, बेलपत्ता, केळखांब, आंब्याची पानं, विड्याची पानं आणि 21 पत्रींनी बाजार फुलून गेलेत.
 

 

 

Untitled-3चायनीज मार्केटचा ठसा
गणपती येणार म्हणून आता घरोघरी लगीनघाई सुरु आहे. घराला रंगरंगोटी करण्यापासून बाप्पांसाठी सजावट करण्यापर्यंत आणि पूजेच्या साहित्यापासून ते आरतीच्या पुस्तकापर्यंतची खरेदी होते. त्यासाठी दरवर्षीप्रमाणं राज्यभरातील बाजारपेठा फुलून गेल्यात. कोट्यवधींची ही बाजारपेठ आहे. प्रामुख्यानं सजावटीचं साहित्य आणि लाईटच्या माळांवर चायनीज मार्केटचा ठसा यंदाही कायम आहे. विविधरंगी प्लॅस्टीक फुलांच्या माळा, प्लॅस्टीक फुलांच्या कमानी, कारंजे, डिस्को बल्ब, मिरर बल्ब, राईस बल्बच्या माळा, एलईडी स्पॉटलाईट, लेसर लाईट, आदी चायनीज वस्तू बाजारात असून तुलनेनं त्या स्वस्त असल्यानं त्यांना चांगली मागणी आहे.

 

Untitled-14

झेंडू, कण्हेरीपासून कमळही
फुलबाजारात मोठ्या प्रमाणात झेंडू तसंच शेवंतीची फुलं पहायला मिळतायत. याचबरोबर मोगरा, लाल शेवंती, निळी शेवंती, पिवळी शेवंती, कण्हेरी, सायली, जाई, जुई, केवडा, गुलाब, कमळ ही फुलंही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आहेत. शोभिवंत फुलंदेखील मोठ्या संख्येनं आहेत. जर्बेरा, ट्युलिप, ऑर्कीड, कॉर्नेशिअन, स्प्रे कॉर्नेशिअन, ओरिएंटल आदींचा त्यात समावेश आहे. ही फुलं देशी फुलांपेक्षा टिकाई असली तरी महागडी असतात. त्यामुळं प्रामुख्यानं गणेश मंडळांकडून त्यांनी मोठी मागणी होते, असं विक्रेत्यांनी सांगितलं.

 

दादर फुलबाजारातील भाव
झेंडू - ५० ते ८० रु. किलो
शेवंती - १२० रु. किलो
कण्हेरी - १ ६ ० रु किलो
मोगरा - ४ ० ० रु किलो
सायली - ४ ० ० रु किलो
कळीची जास्वंद ५ रु ला एक

 

Untitled-28शोभिवंत फुलांचे भाव
ऑर्कीड - २५० रुपयाना वीस
कॉर्नेशिअन, २०० रुपयाना वीस
स्प्रे कॉर्नेशिअन - २०० रुपयाना वीस
ओरिएंटल - ६०० २ ० ० रुपयाना जुडी
ग्लाडीओला - १५० रुपयाना पन्नास काड्या

 

 

पूजेला आवश्यक फुलं
फुले - मंदार, चाफा, गोकर्ण, जाई, जास्वंद, शेवंती, गुलाब, पारिजातक आदी
दुर्वा
पत्री - २१ प्रकारची २१ पाने - मोगरी, माका, बेल, पांढ-या दुर्वा, बोर, धोत्रा, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कन्हेर, रुई, अर्जुन, सादडा, विष्णुक्रान्त, डाळींब, देवदार, पांढरामरवा, पिंपळ, जाई, केवडा, अगस्ति पत्र

 

पूजासामग्रीची दुकानंही खच्चून भरलीत Untitled-25

हळद, कुंकू, अष्टगंध, अबीर, गुलाल, शेंदूर, चंदन, रांगोळी, सुपारी कापसाच्या वाती,
फुलवाती, कापसाचं वस्त्र, शेला, अलंकार, धूप, कापूर, अगरबत्ती, अत्तर, गोमूत्र, मध आदींचा त्यात समावेश आहे.

 

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.