स्पेशल रिपोर्ट

बेटीला धनाची पेटी करणारी योजना!

ब्युरो रिपोर्ट, लातुर
जुनी म्हण होती...पहिली बेटी अन् धनाची पेटी. पण जमाना बदलला. 'हम दो हमारे दो' वरुन आता हमारा एकच! वंशाला दिवा नको का? मग एकच पाहिजे आणि मुलगाच पाहिजे. त्यासाठी मग गर्भात असतानाच मुली मारुन टाकण्याचं आधुनिक तंत्र आलं. मलींची संख्या चिंताजनक घटल्यानं जाग आलेल्या सरकारनं विविध उपाययोजना केल्या. मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी योजना आल्या. यात एक पाऊल पुढं टाकत उदगीरच्या बाजार समितीनं सुशीलादेवी देशमुख बालिका बचाव ही अभिनव योजना सुरु केलीये. सहकारी संस्थेनं स्वयंस्फूर्तीनं सुरु केलेला अशाप्रकारचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असून त्याला आता गोड फळं येऊ लागलीत.
 

  


बालिका बचाव उपक्रम

दारिद्र्य, चुकीचे समज, अशा अनेक सामाजिक कारणांमुळं मुलगी जन्माला येणं, म्हणजे धास्ती असते. मुलगी म्हणजे परक्याचं धन आणि मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, ही गोष्ट तर समाजमनावर खोलवर रुजलेली.

save-girl-childत्यामुळंच मुलगी जन्माला येताच आई-वडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागते. अनेकदा पैशांआभावी कुटुंबातुन सर्वात आधी मुलीला शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. थोडक्यात मुलीला घरापासून दुय्यम वागणूक मिळायला लागते. या सर्व गोष्टींचा विचार करुन मुलगी हा कुटुंबाला बोजा वाटू नये, या उद्देशानं लातुर जिल्ह्यातील उदगीर बाजारसमितीनं बालिका बचाव हा उपक्रम सुरु केला.बाजारसमितीशी संलग्न असलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबात मुलगी जन्माला आली, की लगेच तिच्या नावावर पाच हजार रुपये जमा करण्यात येतात. मुलगी अठरा वर्षांची झाली, की हे पैसे व्याजासह मुलीला मिळतात. यामुळं मुलीला ज्यावेळी पैशांची गरज असते त्याकाळात थोडीफार आर्थिक मदत होते.

 

278 शेतकऱ्यांना झालाय लाभ
शेतकर्‍यांच्या कष्टावर अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्या आर्थिकदृष्टीनं सक्षम झाल्या आहेत. या बळीराजाचे ऋण फ़ेडण्य़ासाठीच 'सुशीलदेवी देशमुख बालीका बचाव' ही अभिनव योजना गेल्या वर्षी सुरु केल्याची भावना उदगीर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पहिल्याच वर्षी या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 278 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय. चालू वर्षी किमान पाचशे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचं उद्दीष्ट बाजारसमितीनं ठेवलंय. बाजारसमितीला होणाऱ्या नफ्यातून या याजनेसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जोरावर कृषीउत्पन्न बाजार समिती पैसा कमवते त्यांना काहितरी परतावा करावा, ही यामागची प्रामाणिक भावना आहे, अशी माहिती योजनेची संकल्पना मांडणारे माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांनी दिली.

 

बाजार समितीशी जोडलेत 16 हजार शेतकरीvlcsnap-2013-10-18-13h47m55s77
उदगीर आणि आजुबाजूच्या परिसरातील जवळपास 16 हजार शेतकरी उदगीर बाजार समितीशी जोडले गेलेत. मराठवाडा आणि दुष्काळ यांचं खुप जूनं नातं आहे. या दुष्काळामुळंच इथल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थीती बेतास बात असते. तसंच मराठवाड्यात मुलींचं प्रमाण हे मुलांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळं आधीच हालाखीच्या परिस्थितीत आयुष्य जगणाऱ्या शेतकऱ्यांना मुलीचा जन्म म्हणजे संकट वाटतं. या शेतकऱ्यांची ही भीती घालवण्यासाठी आणि मुलांच्या तुलनेत मुलींचं प्रमाण वाढण्यासाठी बाजारसमितीनं ही योजना सुरु केलीय. त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय, याबद्दल भोसले यांनी समाधान व्यक्त केलं.

 

25 लाखाच्या निधीची तरतूद
गेल्या वर्षी या योजनेसाठी 13 लाख 90 हजार रुपयांचा निधी उदगीर बाजार समितीनं उपलब्ध करुन दिलायं. यावर्षी मिळणारा प्रतिसाद लक्षात घेवून या योजनेसाठी पंचवीस लाखाचा निधी अरक्षित करण्यात आलाय. त्याचा जवळपास पाचशे लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. राज्य सरकारनं महिला आणि मुलीच्या सरंक्षणासाठी अनेक योजना सुरु केल्यात आहेत. त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सरकारची धडपड सुरु आहे. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीनं अशा प्रकारची योजना राबवून थेट लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहचवून एक आदर्श निर्माण केलाय, एवढं खरं!

 

  

Screen Shot 2013-10-18 at 3.17.46 PMअसे आहेत लाभ घेण्याचे निकष -
-लाभार्थी हा उदगीर तालुक्याचा रहिवासी हवा, तसा दाखला त्याच्याकडे असावा.
-अर्जदाराकडे सात बारा आणि आठ अ चा ’उतारा असावा.
-मुलीच्या जन्माचा दाखला हवा.
-मुलीच्या जन्मानंतर एक महिन्याच्या आत कृषी उत्पन्न बाजार समितीकडे संपर्क करुन अर्ज भरुन द्यावा

या अटींची पुर्तता झाली, की लाभार्थी मुलीच्या नावे राष्ट्रीयकॄत बॅंकेत पाच हजार रुपये आठरा वर्षासाठी जमा करण्य़ात येतात.

 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.