स्पेशल रिपोर्ट

दिवाळीवर सावट महागाईचं!

रोहिणी गोसावी, मुंबई
दिवाळीसाठी बाजार खच्चून भरलाय. या बाजारात काही नाही ते विचारा...पणत्या, रांगोळीपासून रंगीबेरंगी आकाशकंदील, खाद्यपदार्थ, भेटवस्तू अशा सर्व वस्तू आहेत. बहुतांश नोकरदार मंडळींना बोनसही मिळलाय. पण...महागाईनं दिवाळी खाऊन टाकलीय. झालंय असं...गेल्यावर्षीच्या तुलनेत फराळ, सुकामेवासह सर्वांचेच भाव जवळजवळ दुपटीनं वाढलेत. त्यामुळं नेहमीच्या तुलनेत बाजारपेठेतील उलाढाल निम्मीपण झालेली नाही. महागाईमुळं खिशाला कात्री लागल्यानं दिवाळी आटोपशीर साजरी करण्यावर सर्वांनी भर दिलाय, असं चित्र पहायला मिळतंय.
 

 

आकाशकंदीलांनी दुकान उजळून निघाली, की दिवाळीची चाहुल लागते. नवीन कपडे, नवीन वस्तू, रोषणाई....असं दिवाळीचं नाविन्य काही संपत नाही. बाजार खच्चून सजल्यानं हळूहळू सगळं वातावरण दिवाळीमय होत जातं. खरेदी दिवाळीत करायची नाही मग कधी वो...! त्यामुळंच घरोघरी खरेदीचे बेत आखले जातात. खरेदीनं दिवाळीचा आनंद दुप्पटीनं वाढतो. बाजारात सगळीकडं रंगीबेरंगी आकाशकंदिल...कपडे, सुक्या मेवाची पाकिटं....फटाके...असं भारावुन टाकणारं वातावरण असतं. बाळगोपाळांपासून मोठ्यांपर्यंत, दुकानदारांपासून गृहिणीपर्यंत अशा सर्वांसाठी सगळ्याच गोष्टींचे अनेक पर्याय बाजारात बघायला मिळतात. रांगोळीचे विविध रंग तर गृहिणींचे खास आवडते. त्यामुळं खरेदी होतेय पण महागाईन दिवाळी खाऊन टाकलीय.

 

किमती भिडल्या गगनाला
वाढती महागाई हा सर्वांचीच डोकेदुखी झालीय. महागाई कुणाचीच म्हणजे अगदी सरकारचीसुद्धा पाठ सोडत नाही. त्याला दिवाळी तरी कशी अपवाद असणार? दिवाळीवरही महागाईचं सावट आहे. दिवाळीसाठी एरवी लाखोंची उलाढाल होणाऱ्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील लगबग ऐन दिवाळीत गायब झालीय. कोणतीही वस्तू घ्यायला गेलं की त्याची किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट झालीय. गेल्यावर्षी 150 रुपयांना मिळणारा आकाशकंदीलासाठी यंदा 300 रुपये मोजावे लागतायतं. 500रु किमतीची लाईटच्या माळेची किंमत यंदा 1000-1200 इतकी आहे. सुका मेव्याची तिच परिस्थिती आहे. दिवाळीत सुकामेवा भेट म्हणुन दिला जातो. त्यासाठी एकदम आकर्षक सजावट करुन पॅक केलेला सुका मेवा बाजारात मिळतो. त्याला मोठ्या प्रमाणात मागणीही असते. पण, या वर्षी मात्र सुकामेव्याच्या भावातही सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळं ग्राहकांचीही निराशाच झाली आहे.

 Re Diwali-1Re Diwali-2Untitled-3Untitled-4


चायनीज वस्तुंचं प्राबल्य

चायनीज वस्तूंनी जगभरात हातपाय पसरलेत. भारतीय बाजारपेठेचीदेखील तीच अवस्था आहे. बाजारात चायनीज वस्तूंची नेहमीच रेलचेल असते. आकर्षक बांधणी आणि कमी किमतीमुळं गेल्या काही वर्षांपासून चायनिज आकाशकंदील ग्राहकांच्या पसंतीला उरतायत. लाईटच्या माळा, पणत्या आदी वस्तुंचीही अशीच परिस्थिती आहे. त्या घेण्याकडं ग्राहकांचा जास्तीचा कल असल्याचं पहायला मिळतंय.

 

vlcsnap-2013-10-30-15h00m54s220लक्ष्मीपूजनासाठी चोपड्या, वह्या...
पाच दिवसांच्या दिवाळीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन! घरातली लक्ष्मी घरधन्याच्या कष्टानं घरात आलेल्या लक्ष्मीची पूजा करते. व्यापाऱ्यांसाठी तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. जमाखर्चासाठी व्यापारी चोपड्या किंवा वह्या खरेदी करतात. त्यांचं पूजन लक्ष्मीपूजनादिवशीच होतं आणि त्यानंतरच व्यापाऱ्यांच्या नवीन वर्षाला सुरुवात होते. त्यामुळं चोपड्याही बाजारात उपलब्ध आहेत. लहान-मोठ्या वेगवेगळ्या भाषांमधल्या, वेगवेगळ्या आकाराच्या अनेक चोपड्या आणि वह्या बाजारात उपलब्ध आहेत.

 


मनसोक्त फराळाला कात्री...

गेल्या वर्षी 50-50 किलो फराळ दोन दिवसात संपले होतं. पण यंदा साधं 20 किलो फराळ आठ दिवस झाले तरी संपतच नाहीये, असं एपीएमसी मार्केटमधील फराळ विक्रेत्यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं. आजच्या धकाधकीच्य़ा काळात रेडीमेड दिवाळी फराळ, हे नोकरदार महिलांसाठी मोठा आधार असतो. पण महागाईमुळं यंदाच्या दिवाळीत मात्र या रेडीमेड फराळाकडंही महिलावर्ग फारसा फिरकलेला नाही. साहजिकच त्याची विक्री एकदमच कमी झालीय. Diwali-11घरी फराळ बनवणाऱ्या महिलांच्या बजेटवरही महागाईचा परिणाम झालेला दिसतोय. गेल्या वर्षापर्यंत जे सामान घ्यायला 5-6 हजार रुपये लागत होते तेच आणि तेवढंच सामान घ्यायला यावेळी 12 हजारांवर रुपये मोजावे लागत असल्याचं खरेदीसाठी आलेल्या प्रभावती पाटील यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं.

 

महागाईमुळं अपेक्षीत ग्राहक नसल्यानं व्यापारी, विक्रेते कातावून गेलेत. गिऱ्हाईकच नाही. जे येतात ते वस्तुंच्या किंमती बघून परत जातात असं राजेश भानुशाली यांनी सांगितलं. थोडक्यात काय तर आटोपशीर दिवाळी साजरी करण्यावर सगळ्यांचाच भर आहे. महागाईनं दिवाळी खाऊन टाकलीय बघा.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.