स्पेशल रिपोर्ट

इडा पिडा जावो, बळीचं राज्य येवो...!

ब्युरो रिपोर्ट, सातारा
अवघ्या भारतवर्षात साजरा केला जाणारा दिवाळी किंवा दीपावली हा शेती आणि शेतकरी यांच्याशी संबंधित सण आहे. तो बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. काळ्या मातीत कठोर परिश्रम केल्यानंतरचा विसावा आणि त्याचवेळी घरी येणाऱ्या धान्यलक्ष्मीचं स्वागत असं दिवाळीचं स्वरुप आहे. शेतीतून आलेली पिकं हुरडा, ओंब्या, कणसे वगैरे नव्हाळीच्या वस्तूंचा सामूहिकरित्या आस्वाद घेण्याची दिवाळीतील परंपरा आजही पाळली जाते. हे सर्व करताना 'इडा पिडा जावो, बळीचं राज्य येवो,' अशी मनोमन प्रार्थना शेतकरी राजा करतोय.  

 

balirajaबळीराजा आणि त्याचं राज्य...

सम्यक, संतुलित म्हणजेच जिथं अन्याय नाही, शोषण नाही, अशी व्यवस्थी बळीराजानं निर्माण केली होती. प्रजापालन करताना खऱ्या अर्थानं प्रजेचा विश्वस्त म्हणून कारभार हाकणारा बळीराज हा अतिशय दानशूर होता. त्यामुळंच दिवाळीत भाऊबीजेला ओवाळताना बहिण 'ईडा पीडा जावो, बळीचं राज्य येवो' अशी मनोमन प्रार्थना करते. महात्मा ज्योतीराव फुले यांनी ह्याच म्हणीद्वारे बळीराजाचा इतिहास जगासमोर मांडलाय. "तुका म्हणे झरा मूळचाच आहे खरा" या अभंगानुसार मुळची सिंधू संस्कृती बळी संस्कृतीच होती. त्यामुळं लोकांनी ती म्हणी, गाणी, वाणी, याद्वारे जपून ठेवलीय. सिंधू संस्कृतीचं उत्खनन झाल्यावर तर अवघ्या जगाला माहित झालं की वैदिक संस्कृती म्हणजे आर्य, ही भारताची आद्य संस्कृती नसून मातृसत्ताक बळीवंशीय सिंधू संस्कृती ही भारतीयांची मूळ संस्कृती आहे.


बळीराजा : कृती, प्रकृती आणि संस्कृतीचा तजेलदार मोहर
जागतिक कीर्तीचे विचारवंत, प्राच्यविद्या संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी मोठं बौद्धीक खोदकाम करुन बळीराजाचा इतिहास समाजासमोर मांडलाय. त्यांच्या 'बळीवंश' या पुस्तकाच्या लाखो प्रति खपल्यात. बळीराजा हा सात काळजांच्या आत जपून ठेवावा, असा निरागस माणूस. आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचं व हक्काचं फळ सम्यक पद्धतीनं विभागून देणारा 'संविभागी नेता' होता. भारतीयांचं वास्तव आणि विधायक पूर्वसंचीत असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृतीचा तजेलदार मोहर...अशा शब्दात त्यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना बळीचा गौरव केला.

 


bali 01बळीचा इतिहास...

बळी हा हिरण्यकशिपुचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र कपिलचा पुतण्या आणि बाणाचा पिता. सुमारे साडेतीन ते पाच हजार वर्षापूर्वी होवून गेलेला बळी हा भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. विष्णूच्या वामन अवतारानं तीन पावलं जमीन मागून बळीराजाला पाताळात गाडलं, अशी पुराणकथा असली तरी त्यामागंच्या सामाजिक वास्तव्याची फोड डॉ. साळुंखे यांनी केलीय. ते म्हणतात. बळी राजाशी वामनानं सुरुवातीला मैत्रीचं नाटक केलं. मग कपट करून बळीला पकडलं. बळीला वध स्तंभाला बांधलं. बळीच्या मस्तकावर द्वेष भावनेनं लाथ मारली आणि त्याचा खून केला .

 

bali rajaबळीला वामनाने का मारले...?
बळी अत्यंत सदगुणी होता, पराक्रमी, प्रजाहितदक्ष, संविभागी होता. मानवी इतिहासात त्याच्याच काळात शेती सर्वात जास्त भरभराटीला आली होती. बळीराजा शेतीला जीवापाड जपणारा होता, म्हणूनच शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात. शेतीची शेतकऱ्याची सर्वात जास्त काळजी वाहली ती याच लाडक्या बळीराजानं. शेतकरी सुखी तर देश सुखी, हे प्रत्यक्ष बळीराज्यात होतं. तरिही बळीराजाला का मारलं? तर बळीराजानं यज्ञ-संस्कृती नाकारली होती. मुळचे रहिवासी नसलेले आर्य मात्र याच गोष्टीमुळं दु:खी होते. बसल्या-बसल्या आयतं मिळत नव्हतं. लोकांना यज्ञ कर्मकांडात गुंतवावं तर बळीचा विरोध. म्हणून वामनास बळीवर आक्रमण करायला आर्यांनी पाठवलं. वैदिकांनी उर्फ आर्यांनी उर्फ ब्राह्मणांनी आजपर्यंत समोरासमोर युद्धात कुणाचा पराभव केलेला नाही. समोरासमोर नाही मग कपट करून मारणं सोपं म्हणून इथंही तोच मार्ग वापरला. बळीशी पहिल्यांदा दोस्तीचं नाटक केलं. मग एकांत साधून त्याचा खून केला. या धूर्त कृत्यावरून पुढं म्हण तयार झाली.... वाममार्गाला लागू नये.baliraja 1दिवाळीला भरतो बळीराजा महोत्सव
दिवाळी हा बळीराजाचा सण असल्यानं बहुजन विकासाठी स्थापन झालेल्या अनेक सामाजिक संस्था दिवाळीत बळाराजा महोत्सव भरतात. बलिप्रतिपदेदिवशी बळीच्या प्रतिमेचं पूजन करुन त्याची गावातून मिरवणूक काढली जाते. तसंच त्याची महती गाऊन त्याला अभिवादन केलं जातं. अन्नदात्या शेतकऱ्याला तर बळीराजा या नावानं सार्वजनिक हाक घालण्याची आपली संस्कृती आहे. एवढा तो नसानसात भिनलाय. दिवाळीत बलीप्रतिप्रदेला भारतात म्हणजेच ग्रामीण भागात `इडा पिडा टळो, बळीचं राज्य परत येवो’ अशी अपेक्षा केली जाते. बलिप्रतिपदा ही बळीराजाच्या या देदीप्यमान कालखंडाची आठवण म्हणून महाराष्ट्राच्या गावागावात साजरी होते. बळीचं राज्य परत येवो, अशी तमाम भारतवर्षाचीच इच्छा आहे. त्यासाठी बळीराजाला म्हणजेच आपल्या अन्नदात्या शेतकऱ्याला आपण शुभेच्छा देऊया.baliraja 3|| बळीराजा ||

आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर ||
होते रणधीर ||मरुत्यास ||
बळीस्थानी आले शूर भैरोबा ||
खंडोबा,जोतिबा || महासुभा ||१||

सद् गुणी पुतळा राजा मुळ बळी ||
दशहरा,दिवाळी ||आठविती ||२||

क्षत्रिय भार्या "इडा पीडा जाओ ||
बळी राज्य येवो "||अशा का बा ?||३||

आर्य भट आले,सुवर्ण लुटिले ||
क्षत्री दास केले ||बापमत्ता ||४||

वामन का घाली बळी रसातळी ||
प्रश्न जोतीमाळी ||करी भटा ||५||
-महात्मा जोतीराव फुले.

 

 
 
 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.