पहिल्यांदा प्रशिक्षण घेतलं....
आपल्याकडं अजूनही शेतीकडं व्यवसाय म्हणून पाहिलं जात नाही. साहजिकच शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टीकोनाची वाणवा आहे. मात्र गायकवाड त्याला अपवाद आहेत. अगदी सुरवातीपासून व्यवसाय म्हणूनच ते शेतीकडं पाहतात. त्यांच्याकडं एकूण आठ एकर शेती असून त्यांची प्रयोगशील वृत्तीमुळं वेगळं काहीतरी करुन दाखवण्याची त्यांची नेहमीच धडपड असते. त्यातूनच त्यांना कार्नेशन फुलांच्या शेतीबद्दल माहिती मिळाली. एकूण साधकबाधक विचार करुन त्यांनी कार्नेशन फुलांची लागवड करायचं निश्चित करुन माहिती काढण्यास सुरवात केली. बारावीपर्यंत शिकलेल्या रंगनाथ गायकवाड यांनी ग्रीन हाऊससारखी आधुनिक शेती करण्यासाठी प्रशिक्षण घेणं गरजेचं वाटलं. त्यातूनच मगं त्यांची पावलं तळेगावच्या नॅशनल इस्टिट्यूट ऑफ हॅार्टिकल्चरकडं वळली. तिथं त्यांनी पाच दिवसांचं प्रशिक्षण घेतलं. यामुळं त्यांना या तंत्रातील बारकावे समजलेच शिवाय आत्मविश्वासही वाढला.
...अशी आहे कार्नेशन फुलशेती
प्रशिक्षण घेऊन परतल्यानंतर त्यांनी कार्नेशन फुलशेतीला सुरवात केली. सुरवातीला भागभांडवल म्हणून त्यांना सुमारे 55 लाखांचा खर्च अपेक्षित होता. यासाठी त्यांनी बँकेतून कर्ज काढून ग्रीन हाऊस उभारलं. सुमारे एक एकर शेतीत ग्रीन हाऊस उभारणं ही त्यांच्यासाठी जिकीरीचं काम होतं. मात्र, त्यांनी मोठ्या जिद्दीनं ठरलेल्या वेळेत त्याची उभारणी केली. ग्रीन हाऊसला पांढऱ्या मंडपाचे दोन २ शेड केले. कार्नेशनची रोपं फक्त लाल मातीतच लावली जातात. शेडमध्ये लाल माती पसरवून प्रत्येकी रांगेत बेड तयार केलेले आहेत. असे जवळपास 45 बेडमध्ये साधारणपरणे ४३ हजार रोपांची लागवड केली आहे. ही रोप चांगल्या दर्जाची असावीत यासाठी त्यांनी ती थेट विदेशातूनच मागवली. प्रत्येक बेडला जाळीचं कव्हर केलेलं आहे. कार्नेशन फुलांची लाल, पिवळा, पांढरा अशा तीन रंगांची फुलांची लागवड त्यांनी केलीय. रोपांना शेणखत, गांडूळखत टाकण्यात आलंय. रोज या रोपांना २० मिनिटं पाणी दिलं जातं. याशिवाय रोपांना वेळोवेळी औषध फवारणी केली जाते. रोपं नाजूक असल्यामुळं याचं किड्यांपासून संरक्षण करणं गरजेचं असतं. त्यासाठी ग्रीन हाऊसमध्ये प्रत्येक बेड जवळ किड्यांना आकर्षित करण्यासाठी आणि किडे चिपकण्यासाठी पिवळे स्टिकअर्स लावण्यात आलेले आहेत. रोपांची निगा राखण्यासाठी राखण्यासाठी ६ महिला मजूर इथ राबतात.
निर्यातीतून मिळाला चांगला नफा
कार्नेशनच्या फुलांना सध्या मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध आहे. रंगनाथ हे स्वतः प्रत्यक्ष माल विक्री करतात. कुठल्या दलालाचा किंवा व्यापाऱ्यांचा ते मुळीच आधार घेत नाहीत. त्यांचा माल मुंबई, हैद्राबाद, राजकोट, दिल्ली, विजयवाडा, गुजरात आदी राज्यात ते पाठवतात. कार्नेशन फुलला प्रत्येकी ४ रुपयांपासून ते १४ रुपयांपर्यंत भाव मिळतो, तर बंडलला ९६ ते १४० पर्यंत भाव मिळतो. एका बंडलामध्ये २० फुलं असतात. या फुलांचा उपयोग सजावटीसाठी केला जातो. तसंच त्यांची मोठ्या प्रमाणात निर्यातही होते. सिझनला परदेशात मोठी मागणी असते. मागणीनुसार ते फुलांची निर्यातही करतात. फुलांची निर्यात ही प्रामुख्यानं विमानातून होते. सर्व खर्चे वजा जाता त्यांना आतापर्यंत निर्यातीतून चांगला नफा मिळालाय.
ग्रीन हाऊससाठी वॉटरहार्वेस्टिंग पद्धत
रंगनाथ गायकवाड यांनी पिकांना पाण्याची उत्तम सोय केली आहे. कार्नेशन फुलशेतीला ते वॉटरहार्वेंस्टिंग पद्धतीनं पाणी देतात. ग्रीन हाऊसच्या शेडवर त्यांनी पूर्ण पाईप लाईन केली असून पावसाळ्यात हे पाणी पाईपद्वारा जमिनीत खड्ड्यात साठवलं जातं. त्यामुळं पाण्याची मोठी बचत तर होतेच शिवाय वाया जात नाही. यामुळं उपलब्ध पाणी त्यांना वर्षभर पुरतं. कार्नेषण हे तीन वर्षाचं पीक असून पहिल्या वर्षी ३७ लाखांची तर दुसऱ्या वर्षी २२ लाखांची उलाढाल झाली. खर्च वजा जाता त्यांना आठ लाखापर्यंत निव्वळ नफा मिळालाय.
रंगनाथ गायकवाड यांनी कार्नेशन फुलांशिवाय चिक्कू, अंजीर, पपई, केळी, आंबा, फणस, पेरू, नारळ, सीताफळ, आवळा इत्यादी फळांची रोपही लावलीत. याशिवाय मका लागवडीतूनही ते चांग लावली आहेत आणि त्याचा हि त्यांना मोठ्या प्रमाणात नफा होतो आहे.
Comments
- No comments found