स्पेशल रिपोर्ट

टोलविरोधात कोल्हापूरकरांचा उद्रेक

ब्युरो रिपोर्ट, कोल्हापूर
कोल्हापूरच्या दोन्ही मंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्या मुळे आणि आयआरबी ने सकाळ पासून टोल वसुली पुन्हा सुरु केल्याच्या निषेधार्थ रविवारी कोल्हापूरकरांच्या भावनांचा पुन्हा उद्रेक झाला. फुलेवाडी टोल नाका, शिरोली नाका,शाहू नाका, आर के नगर टोल नाका अशा सर्वच टोल नाक्यांवर कोल्हापुरकरांनी हल्लाबोल केला. संतप्त झालेल्या नागरिकांनी टोल विरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागत टोल बुथवर दगफेक,करून तोडफोड केली. यावरच यावर न थांबता त्यांनी सर्वच्या सर्व टोल बूथ पेटवून दिले. दोन्ही मंत्र्यांनी कोल्हापूरचा विश्वासघात केल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापूर बंदचं आवाहन केलंय.
 

 

 

फुलेवाडी - फुलेवाडी टोल नाक्यावर सकाळी टोल वसुली सुरु असल्याची बातमी मिळताच सकाळी ९ वाजण्याच्या सुमारस आमदार चंद्रदीप नरके यांचेसह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शासनाच्या विरोधात तसेच आयआरबीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी टोल विरोधातील संतापाचा उद्रेक अनावर झाला. आणि आंदोलनाने हिंसक वळण घेतले. उभा असणारा टोल नाका काही क्षणांत जमीनदोस्त झाला. दरम्यान कोल्हापूरच्या महापौर सुनिता राऊत यांच्या वाहनाला टोल मागितल्याने त्याही संतप्त झाल्या. आणि खुद्द महापौरांनीच आयआरबी च्या कार्मचाऱ्याला चपलांचा प्रसाद दिला. महापौर सुनिता राउत यांनी टोल विरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावरंच सेना आमदार चंद्रदीप नरके यांच्या सोबत ठिय्या मंडला. सुमारे तास भर चाललेल्या आंदोलनात फुलेवाडी नाका मात्र भुईसपाट झाला.

 

शिरोली – जेष्ठ नेते प्रा. एन. डी.पाटील यांनी शिरोली टोल नाक्यावर येऊन टोल सुरु आसल्यची खात्री करून घेतली. स्वतःकडे आजच्या तारखेची टोल वसुलीची पावती घेतली. यावेळी टोल नाक्यावर प्रा. एन. डी.पाटील यांनी ठाण मांडल्यावर टोल वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नाक्यावरून पळ काढला. प्रा. एन. डी.पाटील यांनी टोल नाक्यावर ठाण मांडल्याची बातमी जिल्हाभर पसरताच सर्वपक्षिय टोल विरोधी कृती समितीच्या सदस्यांनी शिरोली टोल नाक्यावर धाव घेतली. ‘देणार नाही देणार नाही,टोल आम्ही देणार नाही’ अशी जोरदार घोषणाबाजी करत तोडफोड चालू केली. चारही बाजूंनी तुफान दगडफेक करत टोल बूथ वर हल्ला केला. आय आर बी लिहिलेले फलक आणि सीसीटीव्हीचे खांबही उखडून टाकण्यात आले. सुमारे दोन तास सुरु असणाऱ्या धुमश्चक्री नंतर सहाही टोल बूथ, जनरेटर आणि सर्वर रूम सह पेटवून देण्यात आले. यावेळी एकाच आगडोंब उसळला. या अगीचे लोट सुमारे २ किलोमीटर अंतरावरूनही दिसत होते. यावेळी आग आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीवरही संतप्त आंदोलकांनी दगडफेक करत अग्निशमन दलाला माघार घेण्यास भाग पाडले. तब्बल सहा तासाहून  अधिक सुरु असणाऱ्या धुमश्चक्रीमुळे ताराराणी चौकातून पुणे-बेंगलोर महामार्गावर येणा-जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.
यावेळी रस्त्यावर ठाण मांडलेले सर्व आमदार, टोल विरोधी कृती समितीचे पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यावेळी महापौर सुनिता राऊत यांचेसह नगरसेवकही यात सामील झाले. यावेळी झालेल्या दगडफेकीत एक जन जखमी झाला आहे.

 
toll-7

 

शाहू नाका - शहरातील टोल नाक्यांची तोडफोड सुरु असताना शाहू टोल नाक्यावर पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त वाढवला. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. दगडफेक करणाऱ्या कार्यकरर्त्यांचावर पोलिसांना लाठीमार करावालागला. इथंही आंदोलकांनी आय आर बी लिहिलेले फलक आणि सीसीटीव्हीचे खांबही उखडून टाकले. रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त करणाऱ्या आंदोलकांनी आगेकूच करत जोरदार दगडफेक करत टोल बूथ जाळले. जोरदार घोषणाबाजी करत लाठीमार करणाऱ्या प्रशिक्षनार्थी पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडित याच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. यावर पत्रकाराला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात येईल असे आश्वासन ना.हसन मुश्रीफ यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येवून पत्रकारांना दिले.
 तसेच कोल्हापुरातील सरनोबतवाडी, उचगाव, आर.के.नगर, शिये, कळंबा या टोल नाक्यांवरही दगडफेक करण्यात आली आणि सर्व नाके बंद पाडण्यात आले.
दरम्यान  टोल बाबत मंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. परंतु टोल वसुलीसाठीचा आदेश हा न्यायालयाचा आहे. त्यामुळे न्यायालयाचा टोल वसुली स्थगितीचा आदेश येईपर्यंत टोल वसुली सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया आयआरबीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.