स्पेशल रिपोर्ट

तिळगुळ घ्या...गोड बोला...

ब्युरो रिपोर्ट, मुंबई/पुणे
मकर संक्रांत....नविन वर्षातला पहीला सण...मकर संक्रांत म्हटलं...की तिळगुळ, तिळाचे लाडु, तिळपोळी....पतंग...आणि बरच काही डोळ्यासमोर येतं....संक्रांतीच्या वेळी थंडी असते. त्यामुळे शरीराला जास्त उष्मांक देणारे तीळ व गूळ या पदार्थांना या दिवशी फार महत्त्व असते. सूर्य एका राशीतून दुस-या राशीत जाणे यालाच 'संक्रमण' म्हणतात. मकर राशीमध्ये सूर्य जाणे यालाच 'मकर संक्रमण ' असे म्हणतात. ज्या दिवशी सूर्य धन राशीतून मकर राशीमध्ये जातो त्या संक्रमणाच्या दिवशी दरवर्षी  'संक्रांत' हा सण साजरा करतात. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो. आणि हिवाळा संपला असं समजलं जातं.

 

vlcsnap-2014-01-14-11h43m02s10सुगडीचा वसा
सुवासिनी ह्या दिवशी सवाष्णीला सुगडीचा वसा देतात.सुगडीचा वसा म्हणजे लहान मडक्यांतून गव्हाच्या ओंब्या, गाजर व ऊस यांचे तुकडे, पावटयाच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, बोरे, हरब-याचे घाटे, तिळगुळाच्या वडया, हलवा असे पदार्थ घालून त्या मडक्यांना हळदीकुंकू लावून ती सुवासिनींना देतात. भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी आपल्या शेतात पिकविलेल्या भाज्या-धान्य वगैरे नमुन्यादाखल इतर शेतकऱ्यांना देऊन , चांगल्या वाणाची चर्चा व्हावी व अधिक चांगले उत्पन्न देणा-या बियाणांविषयी देव-घेव व्हावी हा सुगडीच्या वशामागचा हेतू आहे.

 


धार्मिक महत्वTilgul kha god god bola
महाराष्ट्रात मकर संक्रांतीचे धार्मिक महत्त्व खूप आहे. या दिवशी कटू संबंध सुधारण्याची संधी मिळते. कळत नकळत कुणाला कटू बोलले गेल्यास त्याची माफी मागून संबंध पूर्ववत करता येतात. त्यासाठीच 'तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला' असे म्हणून एकमेकांना तीळ-गूळ देतात.
मकर संक्रांतीला काळ्या रंगाला प्राधान्य देण्यात येतं. कारण काळा रंग उष्णता शोषुन घेणार आसतो. मकर संक्रांती पासून उन्हाळ्याची सुरूवात होते. पृथ्वीचा उत्तर गोलार्धात प्रवेश होतो. हिंदू श्रद्धेनुसार सूर्य प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्वाचे रूप आहे, जे एक, अद्वैत, स्वयं प्रकाशमान, दैवत्वाचे प्रतिक आहे.
मकरसंक्रांतीपासुनच दर 12 वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याचीही सुरुवात होते.

 

 

Makar-

पतंगोत्सव
संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवणे संकल्पना गुजरातमधुन संपुर्ण भारतात पसरली असं म्हणतात. गुजरातमध्ये हा उत्सव जागतिक पातळीवर साजरा केला जातो. पण आता हा उत्सव त्या समाजापुरता र्मयादित न राहता याचा आनंद भारत वर्षातील सर्व लोक लुटतात. या दिवशी तर गुजरातमध्ये घराला कुलूप लावून सारे कुटुंबच कौलारू घराच्या छपरावर, गच्चीवर पतंग उडवण्यासाठी जाते. तरुण-तरुणी आबालवृद्ध सर्वजण या उत्सवात भाग घेताना दिसतात.

 

 


नरेंद्र मोदी संक्रांतीचंही आकर्षण
मकरसंक्रांतीनिमित्ताने शहरातील बाजारपेठा विविध प्रकारच्या चित्ताकर्षक पतंगांनी सजल्या आहेत. देशात, राज्यात घडणार्‍या घटनांचे प्रतिबिंब पतंगावर चित्ररूपाने उमटत असते. यंदा पतंगांवर नरेंद्र मोदींच्या प्रतिमा मोठय़ा प्रमाणात रेखाटण्यात आल्या आहेत. गुजरातमध्ये, पतंगावर मोदींचे चित्र असलेले विविध आकाराचे पतंग बाजारात विक्रीस आले आहेत. त्याला मागणी देशभर आहे. तसेच लोकप्रिय सिनेनट-नट्या, क्रिकेटर यांचीही चित्रे आहेत.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.