स्पेशल रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट
आपण प्रगती करत असताना साधं जगणंसुद्धा आव्हान बनलेली माणसं आपल्या अवतीभवती आहेत. आपल्याला माणूस म्हणून घ्यायचं असेल तर अशांसाठी काहीतरी करायलाच पाहिजे. आता वेळ आहे, कृतीची. औचित्य आहे, समाज दिनाचं. बाबा आमटेंच्या जन्म दिवसाचं! काहीतरी समाजोपयोगी करु अन् बाबांच्याच शब्दांत म्हणू- 'माणूस माझे नाव, माणूस माझे नाव'...
 
यशवंत यादव
सोलापूर – कटू सत्य आहे, पण एचआयव्हीची बाधा झालेल्या व्यक्तींना आपल्याकडं सहानुभूतीनं वागवलं जात नाही. ज्यांचा काहीही अपराध नाही अशा एचआयव्हीग्रस्त बालकांच्याही नशिबात घोर उपेक्षा येते. अशा बालकांना मायेची ऊब देऊन त्यांचं जीवन उभं करण्याचं काम पंढरपुरातील पालवी ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून करते आहे.
 
अविनाश पवार, पुणे
पुणे - पुण्याजवळ चाकण येथील नियोजित विमानतळासाठी जमिनी देण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. अलीकडंच या बाधित शेतकऱ्यांनी एकीची वज्रमूठ वळून लढण्याचा पवित्रा जाहीर केलाय. त्यामुळंच आतापर्यंत शांतपणं मार्गी लागत असलेल्या या प्रकल्पाची इथून पुढची वाटचाल खडतर असेल, अशी चिन्हं दिसू लागली आहेत.
 
मुश्ताक खान
रत्नागिरी - भारलेलं वातावरण, भरून आलेला ऊर आणि आठवणींचा खजिना घेऊन पुन्हा एकदा रत्नागिरीत येईन, असं सांगून म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू थेन सेन यांनी थिबा राजाच्या वंशजांचा निरोप घेतला.
 
विवेक राजूरकर
औरंगाबाद – शेतीवर भविष्यात येणाऱ्या संकटांचा विचार करून मेहनत आणि योग्य नियोजन केल्यास त्यावर मात करता येते हे जगन्नाथ तायडे या प्रगतशील शेतकऱ्यानं आपल्या कृतीनं दाखवून दिलंय. त्यांनी केवळ अडीच एकर क्षेत्रात १८ लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळवलं, तेही सहा महिन्यांत.
 
मुश्ताक खान
रत्नागिरी - ब्रह्मदेशात म्हणजेच आताच्या म्यानमारमध्ये ब्रिटिशांना मनमानी न करू देणारा गरिबांचा कैवारी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आयुष्य झिजवलेल्या थिबा राजाला ब्रिटिशांनी नजरकैद केलं. ब्रह्मदेशाच्या या शेवटच्या राजाच्या  समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन करण्यासाठी म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू थेन सेन आज (शनिवारी) रत्नागिरीत येत आहेत.
 
मुश्ताक खान
रत्नागिरी - निसर्गसंपन्न दापोली तालुक्यात अनेक महान नररत्नं होऊन गेली. यामुळंच हा तालुका नररत्नांची खाण म्हणून देशात ओळखला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, पां. वा. काणे, महर्षी कर्वे आणि लोकमान्य टिळक ही पाच नररत्नं या भूमीतलीच. या पंचरत्नांच्या गावांना जोडणाऱ्या कॉरिडोरची मागणी दापोलीतल्या शिवराज प्रतिष्ठाननं लावून धरलीय.
 
विवेक राजूरकर
औरंगाबाद – मॉल संस्कृतीमुळं मुख्यतः पारंपरिक किराणा व्यवसाय आणि किरकोळ व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. आता तर एफडीआय आलंय. त्यामुळं किराणा दुकानदारांच्या एकूण व्यवसायावरच गदा येतेय. या मॉल आक्रमणाला सामोरं जाऊन तिच्याशी दोन हात करण्याची तयारी मात्र औरंगाबाद येथील व्यापाऱ्यांनी केलीय. 
 
विवेक राजूरकर
औरंगाबाद – पुरेसा पाऊस न झाल्यानं मराठवाड्यासाठी वरदायीनी असलेल्या जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. त्यातचं नगर, नाशिक जिल्ह्यांतून जायकवाडीत यापुढं पाणी सोडणं शक्य नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. सद्यस्थितीत मराठवाड्यातील तीन हजारांहून अधिक गावांत तीव्र पाणीटंचाई आहे.
 
ब्युरो रिपोर्ट
गोंदिया - गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात उभारण्यात येत असणारा बहुचर्चित अदानी विद्युत प्रकल्प पाण्यावरून पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. वैनगंगेवरील धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी या प्रकल्पाकडं वळवण्यात आल्यानं हा प्रश्न आता चांगलाच पेटलाय.