स्पेशल रिपोर्ट

विवेक राजूरकर
औरंगाबाद - 'प्रवाशांच्या सेवेसाठी' असं ब्रिदवाक्य मिरवणा-या एसटी महामंडळाचं कर्मचाऱ्यांकडं मात्र साफ दुर्लक्ष झालयं. रस्त्यावर धावणाऱ्या बस गाड्यांची तब्येत व्यवस्थित ठेवण्याचं काम करणारे वर्कशॉपमधील कर्मचारीही त्याला अपवाद नाहीत. तुटपुंजा पगारात भरपूर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची अवस्था एकप्रकारे वेठबिगाऱ्यांसारखीच आहे.
 
प्रवीण मनोहर
अमरावती - सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन योजनेमार्फत अनाथ, विभक्त पती-पत्नीच्या अपत्यांना अनुदान मिळतं. मात्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची लेकरं त्यापासून वंचितच आहेत. सरकारी योजनांपासून ही लेकरं वंचित राहतात याची खंत ना सरकारला आहे, ना लोकप्रतिनिधींना... 
 
विवेक राजूरकर
औरंगाबाद – राज्यभरातील एस.टी. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागलीय.
 
अविनाश पवार
अविनाश पवार, पुणे - दुर्बल घटकातील शेतकऱ्यांना पशुपालन शक्य होतंच असं नाही. याकरता शेळीपालन हा उत्तम पर्याय मानला जातो. विशेषतः शेतमजूर एखाद् दोन का होईना शेळ्या सांभाळून त्यावर आपला चरितार्थ चालवत असल्याचं चित्र सगळीकडंच पाहायला मिळतं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्याकरता 'सानेन' जातीची शेळी वरदान ठरली आहे. तिचा प्रसार केलाय पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावातल्या रेन या संस्थेनं.
 
अविनाश पवार
अविनाश पवार, पुणे - उसासारखं नगदी पीक देणाऱ्या जमिनीवर डाळिंबाची लागवड. वाचून आश्चर्य वाटलं ना! हो, हे खरंय. कदाचित तुम्हाला शेतकऱ्यानं घेतलेला हा निर्णय चुकीचा वाटेल. पण, अवर्षणग्रस्त भागातील पाण्याच्या कमतरतेवर मात करत कमी जागेत आणि कमी खर्चात आपल्या दूरदृष्टीनं मोहन धुमाळ या शेतकऱ्यानं डाळिंबाचं भरघोस पीक घेऊन नवा शेतकऱ्यांना आदर्श दिलाय.
 
यशवंत यादव
यशवंत यादव, पंढरपूर - युगे अठ्ठावीस विटेवर उभ्या असणाऱ्या पांडुरंगामुळं पंढरीचा महिमा सर्वदूर आहेच. त्याला आता कार्तिकी वारीला भरणाऱ्या गुरांच्या बाजाराचीही जोड मिळालीय. राज्यभर कुठंही जा, खिलार जोडी दिसली की शेतकरी आपसूक विचारतात... पंढरपुरास्न आणली का? `पंढरपुरी म्हशी' हा तर आता ब्रॅण्डच झालाय. कोट्यावधींची उलाढाल होणाऱ्या या गुरांच्या बाजारानं पंढरीचा तळ सध्या गजबजून गेलाय.
 
अविनाश पवार
पुणे - शेतमाल उत्पादित करण्याबरोबरच प्रक्रिया उद्योगही उभारल्यास तो कसा फायदेशीर ठरतो, हे पुणे जिल्ह्यातल्या बोरी बुद्रुक येथील शेतकरी विठ्ठल शिंदे यांनी दाखवून दिलंय. आवळ्याची शेती आणि त्यावर उभारलेल्या प्रक्रिया उद्योगातून ते आता वर्षाला दहा लाखांहून अधिक उत्पन्न मिळवतायत. 
 
शशिकांत कोरे
सातारा-  जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाची सर्वोत्कृष्ट घटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे कुठे गिरवले असतील? साताऱ्यातल्या एका शाळेत. होय, या शाळेचं नाव छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल. युगपुरुषाला घडवणाऱ्या या शाळेनं बाबासाहेबांच्या आठवणी जतन करुन ठेवल्यात.
 
मुश्ताक खान
मुश्ताक खान, गणपतीपुळे-  जगभरात महापुरूषांची म्युझियम आहेत पण सर्वसामान्य माणसाचं म्युझियम कुठंच पाहायला मिळत नाही. असं सामान्य माणसाचं म्युझियम पाहायला मिळतंय, कोकणात. कोकणातल्या गणपतीपुळे इथं. देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना खऱ्या कोकणची ओळख व्हावी यासाठी, इथं पाचशे वर्षांपूर्वीचं कोकण अर्थात 'प्राचीन कोकण' साकारण्यात आलंय.
 
अविनाश पवार
अविनाश पवार, दरेवाडी, पुणे -  स्वातंत्र्यानंतर तब्बल 65 वर्षांनी दरेवाडी विजेच्या दिव्यांनी उजळली. जुन्नर तालुक्यातील नाणेघाटाजवळील अतिदुर्गम भागात दरेवाडी वसलीय.चाळीस उंबऱ्याच्या या वाडीत रस्ते नाहीत. वीज नसल्यानं रॉकेलचे दिवे, पाण्यासाठी पायपीट, या गोष्टी येथे नित्याच्याच. नव्या पिढीनं वीज आणायचीच हा निर्धार केला. जर्मनीच्या बॉश्च (Bosch) कंपनीनं त्यांना सहकार्याचा हात दिला आणि वाडी सौर विजेच्या दिव्यांनी उजळली.