स्पेशल रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट
 मुंबई - सहा टक्के `आडत` आकारण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध आडत्यांनी बंद पुकारल्यानं राज्यभरातील बाजार समित्यांमधील कामकाज विस्कळीत झालंय. यामुळं शेतमालाचं मोठं नुकसान होत असून 'माळव्याचं करायचं काय', असा प्रश्न शेतकऱ्यांपुढं आ वासून उभा राहिलाय. फळांचाही उठाव होत नसल्यानं फळ उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय.  
 
विवेक राजूरकर
औरंगाबाद – निसर्गत: राज्यात पाण्याबाबत विषमता आहे. 30 टक्के भाग अवर्षणग्रस्त असून त्यात मराठवाड्याचा सर्वाधिक भाग येतो. त्यामुळे अवर्षणप्रवण भागात साठणारं पाणी अवर्षणग्रस्त भागाला देणं ही काळाची गरज आहे, असं ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी 'भारत4इंडिया' शी बोलताना सांगितलं.
 
अविनाश पवार
आदिवासींना हवाय योग्य भाव अविनाश पवार भीमाशंकर - हिरडा! एक आयुर्वेदिक औषध म्हणून आपल्याला माहीत असतो. हा हिरडा येतो सह्याद्री पर्वतरांगांमधील दुर्गम जंगलातल्या झाडांना. हा हिरडा गोळा करतात, आदिवासी. तोच त्यांच्या जगण्याचा आधार. हा आधार बळकट करण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले खरे. पण हे प्रयत्न तोकडेच पडतायत. कारण या हिरड्याला योग्य असा भावच मिळत नाहीये. तसंच हिरड्यावर प्रक्रिया करणारे उद्योगही उभे राहिलेले नाहीत.  बाजारात मागणी रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील भीमाशंकरच्या जंगलात ही हिरड्याची झाडं विपुल आहेत. औषधी गुणधर्मामुळं
 
Comment (0) Hits: 2130
अविनाश पवार
इंदापूर - फिकट हिरवा रंग, छोट्या सफरचंदाएवढा आकार आणि चवीलाही काहीसं सफरचंदाप्रमाणं असलेल्या या जम्बो 'अॅपल' बोराची रविवारी पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डात पहिल्यांदाच आवक झाली. इंदापूर इथून विक्रीस आलेली ही बोरं ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. यातील एका अॅपल बोराचं वजन सुमारे दीडशे ग्रॅम एवढं आहे.   इंदापूरमधील गलांडवाडी नं.१ येथील शेतकरी सोमनाथ फलफले यांनी पश्चिम बंगालमधून ही कलमं आणली.  महत्त्वाचं म्हणजे या बोरांचं मूळ स्थान थायलंडमध्ये आहे.  फलफले यांनी पावणेदोन एकरात सातशे झाडांची बारा बाय आठ अशी बोरांची शेती
 
Comment (3) Hits: 3947
मुश्ताक खान
मुश्ताक खान, मुरूड - स्त्रियांच्या उत्कर्षासाठी आयुष्यभर झटलेले भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या मूळ गावी मुरूडमध्ये असलेलं त्यांचं घर आजही भग्नावस्थेत आहे. येथे स्मारक उभारण्यासाठी सरकारनं निधी मंजूर केलाय खरा, पण गावातच दोन समित्या स्थापन झाल्यानं निधी द्यायचा कोणाकडं हा पेच काही गेली सात वर्षं सुटत नाही आणि स्मारक काही होत नाहीये. 
 
ब्युरो रिपोर्ट
वर्धा - विदर्भातील शेतकरी आत्महत्येचं चक्र काही थांबता थांबत नसल्याचं स्पष्ट झालंय. आता या आत्महत्यांचा नवाच पैलू समोर येतोय. तो म्हणजे कर्जबाजारी शेतकरी आजाराला कंटाळून आत्महत्या करू लागलेत. एकट्या वर्धा जिल्ह्यातच गेल्या चार महिन्यांत 40 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यातील बहुतेकांनी टेन्शनमधून निर्माण झालेल्या  आजाराला कंटाळून आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचं स्पष्ट झालंय. 
 
ब्युरो रिपोर्ट
चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड तालुक्यातील नांदेड या आडवळणाच्या गावात राहणाऱ्या ७२ वर्षाच्या दादाजी खोब्रागडे यांची ओळख वेगळीच आहे. दादाजींना संपूर्ण राज्यात एचएमटी या प्रसिध्द तांदळाचे जनक म्हणून ओळखलं जातं. 1982 मध्ये त्यांनी एचएमटी तांदळाचं वाण विकसित केलं. मात्र
 
प्रवीण मनोहर
अमरावती - विदर्भाचे एक आर्थिक केंद्र असलेला येथील सोयाबीन बाजार स्थानिक संस्था कराच्या (एल.बी.टी.) फेऱ्यात सापडलाय. महानगरपालिकेनं एलबीटीच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतमालावरील एलबीटी शेतकऱ्यांकडून वसूल करण्यास सुरवात केलीय. त्यामुळं शेतकरी शेतमाल बाहेर काढेनासे झाले आहेत.  त्याचा विपरीत परिणाम सोयाबीनच्या आवकवर झालायं. त्यातच एलबीटी ही अडतदारांकडून वसूल केली जाणार असल्याच्या चर्चेनं अडत्यांनी शेतमाल एलबीटीतून वगळण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचं शस्त्र उगारलय. जकात कर प्रणाली असतांना प्रत्येक क्विंटल मागे म्हणजेच एका पोत्याला दोन रुपये एवढा जकात द्यावा लागत
 
Comment (0) Hits: 1521
ब्युरो रिपोर्ट
लातूर – विलासराव देशमुख आणि लातूरचं नातं भावनिक तसंच अर्थकारणाशी जोडलेलं होतं.  विलासराव मंत्रिपदावर आहेत म्हटल्यावर लातूरचा भाव एकदम वधारत असे; तसेच पायउतार झाल्यास भावही खाडकन उतरत असे.  आता तर विलासरावच नाहीत. त्यांच्या जाण्यानं लातूरकरांच्या मनाला घरं पडलीत आणि जमिनीचे भाव चाळीस टक्क्यांनी घसरलेत.
 
विवेक राजूरकर
औरंगाबाद – प्रवाशांच्या सोयीसाठी असं बिरुद मिरवणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधांकडे अजून कुणाचंच लक्ष गेलेलं नाही. आजच्या महागाईच्या तुलनेत त्यांना मिळणारा पगार आणि भत्ता अत्यंत तुटपुंजा आहे. यामुळे कातावलेला वाहक-चालक आता आरोग्याच्या समस्यांच्या फेऱ्यात सापडलाय.