स्पेशल रिपोर्ट

विवेक राजूरकर
औरंगाबाद - वर्षभर शेतात राबराब राबणं, काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी गावोगाव भटकणं हे त्याचं जीवनच झालं होतं. पण दोन वर्षांपूर्वीच आडगाव भोसले या गावात त्याला सालगड्याचं काम मिळालं आणि त्याच्या कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न तात्पुरता तरी मिटला. तो एका पत्र्याच्या २० बाय ३० च्या घरात बायको आणि चार मुलांसोबत आनंदात जीवन कंठत होता... आणि अचानक त्याची आडगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. जीवनाला मिळालेल्या या कलाटणीनं त्याचा जगण्याचा दृष्टिकोनच बदललाय. अशोक समिंद्रे याची ही कथा...
 
Comment (0) Hits: 1300
विवेक राजूरकर
औरंगाबाद – स्वातंत्र्यानंतर गावात प्रथमच एस.टी. बस धावली आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जवळी खुर्दच्या ग्रामस्थांनी दिवाळी साजरी केली. 'गाव तेथे एस.टी.' हे महामंडळाचे धोरण असले तरी औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास ३० खेडेगावात अजून एस.टी. बस जात नाही. येथील ग्रामस्थदेखील आपल्या गावात एस.टी. कधी येणार, याची डोळ्यात प्राण आणू्न वाट पाहताहेत. गावात एस.टी. यावी यासाठी गेली अनेक वर्ष गावकरी पाठपुरावा करत होते. जवळी खुर्द आणि जवळच असलेल्या जवळी बुद्रुक, पळसखेडा आणि बाभुळखेडा येथील ग्रामस्थांना एस.टी. बसअभावी अनेक समस्यांना सामोरं जावं लागत
 
Comment (3) Hits: 1763
ब्युरो रिपोर्ट
परभणी येथील जिल्हा पोलीस विभागाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाला डिझेल पुरवणाऱ्या पंप चालकाने इंधन देणंच बंद केलंय. कारण त्याचं लाखो रुपयाचं बील थकलंय. त्यामुळे जिल्हाभरातील पोलीस ठाण्यातील गाड्या जागेवरच उभ्या आहेत. तर पोलीस अधिकारी स्वत:च्या खिशाला कात्री लावून डिझेल टाकून रोजचा गाडा चालवत आहेत.   थकबाकी लाखोंची जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वाहनांना शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या निखिल पेट्रोलिअम या पंपातून डिझेल पुरवठा केला जातो. परंतु पोलीस प्रशासनाची या पंपाकडे 15 ते 18 लाखांची थकबाकी  आहे. पोलिसांकडे हे
 
Comment (0) Hits: 1083
अविनाश पवार
इंदापूर- आंदोलन... मग ते कोणतंही असो. कार्यकर्त्यांचा जोशच आंदोलनातील विचार पुढे नेत असतो. रस्त्यावर आलेलं आंदोलन धगधगत राहतं ते कार्यकर्त्यांच्या जोशामुळंच. बऱ्याच वेळा हा जोशच कार्यकर्त्यांच्या जीवावर उठतो. मागचा-पुढचा विचार न करता `जय` म्हणत भावनातिरेकापोटी केल्या जाणाऱ्या कृत्यांना विचारांची जोड दिल्यास कार्यकर्त्यांचे जाणारे हकनाक बळी टळू शकतील. नुकत्याच झालेल्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनात इंदापूरमधल्या नरूटवाडीतल्या कुंडलिक कोकाटे या तरुण शेतकऱ्याचा दिवाळीच्या पूर्वसंध्येला असाच बळी गेला आणि सर्वांच्याच मनाला चटका लागून राहिला. शेतकरी संघटनेच्या आंदोलनात कित्येक शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुतीही दिलीय. पण
 
Comment (1) Hits: 1213
ब्युरो रिपोर्ट
  हरवलेली मुलं सापडेनात दिवाळी आली आणि गेली...मात्र देशातील अनेक कुटुंबं गेल्या कित्येक वर्षांपासून दिवाळी सोडाच, पण कुठलाही सण साजरा करू शकलेली नाहीत. पण यामागची कारणं महागाई किंवा गरिबी नाही...या कुटुंबांमधली मुलं बेपत्ता झालीत. ती अजून सापडलेली नाहीत. आपल्या चिमुकल्यांचा आणि त्यांची वाट पाहणाऱ्या पालकांचा हा स्पेशल रिपोर्ट. पुण्यातील वडगाव धायरी भागात राहणाऱ्या किरणे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलंय. कारण त्यांचा एकुलता एक मुलगा अजिंक्य गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता आहे. अजिंक्यची आई मंजुश्री यांना अजूनही आशा आहे, की तो
 
Comment (0) Hits: 1095
राहुल रणसुभे
ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आदिवासींच्या विकासासाठी `आयुश` ही स्वयंसेवी संस्था काम करते. यासंस्थेचे प्रमुख सचिन सातवी यांच्याशी राहुल रणसुभे यांनी केलेली बातचीत. आयुशची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? माणसावर संस्कार त्याच्या बालपणातच होत असतात. मी तलासरी येथे शाळेत होतो त्यावेळी माझ्यावर समाजसेवेचे संस्कार झाले. लहानपणापासून समाजासाठी काही करावं आणि आपल्या ज्ञानकौशल्याचा आपल्या समाजासाठी उपयोग व्हावा, असं
 
Comment (4) Hits: 2783
ब्युरो रिपोर्ट
नाव- बाळ केशव ठाकरे  टोपणनाव -  हिंदुहृदयसम्राट, किंवा रिमोट कंट्रोल  जन्मतारीख - 23 जानेवारी 1926  जन्मस्थान - पुणे  पत्नीचं नाव- मीनाताई ठाकरे मुलं - बिंदुमाधव ठाकरे, जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे  फ्री प्रेसमध्ये कार्टुनिस्ट म्हणून करिअरला सुरुवात, 1960 ला नोकरीचा राजीनामा त्यांची कार्टून संडे टाईम्समध्ये प्रकाशित होत असत  व्यंगचित्राला वाहून घेतलेलं मासिक मार्मिकची सुरुवात  19 जून 1966 ला शिवसनेची स्थापना  ठाकरेंनी महाराष्ट्रातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांसोबत युती केली.  व्हॅलेंटाईन डेला शिवसेनेनं कायम विरोध केला  बाळासाहेब अनेकदा
 
Comment (0) Hits: 1237
रोहिणी गोसावी
सातारा - उघड्या माळरानावरही ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण करणारी लोकरीची घोंगडी...एकेकाळी सातारा जिल्ह्यातील म्हसवडमध्ये या घोंगड्यांचं सर्वात जास्त उत्पादन होत होतं. पण गेल्या काही वर्षात
 
ब्युरो रिपोर्ट
एफआरपी म्हणजे काय? सांगली- साखर कारखाने उसाला प्रतिटन जो दर देतात किंवा पहिला हप्ता देतात,  तो दर केंद्र सरकार ठरवतं. त्याला आधी एसएमपी (वैधानिक किमान मूल्य)  म्हणायचे. केंद्र सरकारने 22 ऑक्टोबर 2009 रोजी ऊसदर नियंत्रण कायद्यात दुरूस्ती करून वैधानिक किमान किंमत रद्द करून त्याऐवजी एफआरपी (रास्त आणि किफायतशीर किंमत) घोषित केली.  या नवीन धोरणानुसार सन 2009-10 मध्ये ऊसाला रास्त आणि किफायतशीर किंमत 1298.40 प्रतिटन, 9.5 मूलभूत साखर उताऱ्यासाठी आणि पुढील वाढीव 1 टक्का साखर उताऱ्याला प्रतिटन रूपये 137 वाढीव दर
 
Comment (0) Hits: 983
मुश्ताक खान
मुश्ताक खान, रत्नागिरी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी आंदोलनादरम्यान पोलिसांनी गोळीबार केला. त्यात तबरेज सायेकर या तरुण मच्छीमाराचा मृत्यू झाला. या घटनेला वर्ष उलटून गेलंय. पण अजूनही सरकारचा एकही प्रतिनिधी तरबेजच्या घरी गेलेला नाही किंवा त्याच्या कुटुंबीयांना कुठलीही मदत मिळालेली नाही. तबरेजच्या वडिलांनी या सरकारी वृत्तीचा निषेध केलाय.  डोळे थकलेले... मन खचलेलं... कुणाचाही आधार नाही... वडिलांना ऑपरेशनसाठी कोणीतरी सोबत यावं यासाठी करावी लागणारी धडपड... संसाराचा गाडा हाकण्यासाठी दुर्दैवी आईला म्हातारपणी दारोदारी जाऊन करावा लागतोय मासेविक्रीचा व्यवसाय... ही परस्थिती आहे राजापूर तालुक्यातल्या साखरीनाटे
 
Comment (12) Hits: 3138