विशेष लेख
Subcategories
-
आषाढी वारी
वारकऱ्यांचा देवच मुळी समता, बंधुता, समन्वयाचं तत्त्वज्ञान रुजवणारा आहे. पंढरपुरात कटेवर कर ठेवून उभा राहिलेला विठोबा म्हणजे रोजचं जगणं सोपं करणारा, बंधुभावानं जगायला शिकवणारा अनाथांचा नाथ. हा लोकांनी लोकांसाठी उभा केलेला लोकदेव आहे.
-
स्वातंत्र्य का नासले?
शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी आयुष्य खर्ची घातलेला शेतकरी नेता, शेतकरी संघटना स्थापन करून शेतकऱ्यांना आत्मभान मिळवून देणारा लढाऊ सेनापती म्हणजे शरद जोशी. शेतीचा अर्थवाद सरकारच्या अजेंड्यावर आणणं असो की सरकारचं शेतकरीविरोधी धोरण वेशीवर टांगणं असो, शरद जोशींनी शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला. या योद्ध्याच्या विचारांमधली धग अजून कायम आहे. त्यांचे हेच विचार ते पुन्हा एकदा 'भारत4इंडिया'च्या माध्यमातून मांडत आहेत. 'स्वातंत्र्य का नासले?' या नावानं त्यांची ही विशेष लेखमाला आम्ही प्रसिद्ध करत आहोत.
-
आंगणेवाडीची जत्रा...
फेब्रुवारी महिना आला की लोकांना आपसूक वेध लागतात ते आंगणेवाडीच्या जत्रेचे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील आंगणेवाडीचं भराडीदेवीचं मंदिर आणि इथली भाविकांच्या अलोट गर्दीनं भारलेल्या वातावरणातली जत्रा माहीत नसलेला माणूस विरळा. इथं येणारा प्रत्येक जण भराडीआईच्या पायी नतमस्तक होऊन जातो. मग तो नेता असो की सामान्य नागरिक... त्याच्यातली उच्च-नीच भावना लयाला जाते आणि उरतो तो केवळ भक्तिभाव... याचं भारलेलं चित्रण रेखाटलंय ऋषी देसाईंनी. पत्रकार असलेले ऋषी देसाईं झी 24तासमध्ये वृत्तनिवेदक आहेत.
-
नामविस्तार दिन
अखेर १४ जानेवारी १९९४ रोजी राज्य सरकारने नामांतराऐवजी नामविस्ताराची घोषणा केली. एकीकडं लढाई जिंकल्याचा आनंद तर दुसरीकडं जवान मुलं गमावल्याचे दु:ख. तरीही आंबेडकरी समाजानं नामविस्ताराचा विजयोत्सव जल्लोषात साजरा केला. तोच आजचा नामविस्तार दिन. तो संघर्ष जागवणारे हे विशेष लेख...
-
६ डिसेंबर १२ विशेष
गुरुवार दिनांक 6 डिसेंबर 1956. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत निधन झालं. सारा देश दु:खात बुडाला. मुंबईत बाबासाहेबांची प्रचंड महायात्रा निघाली. अंत्यविधीच्या वेळी श्रद्धांजलीपर भाषण फक्त एका व्यक्तीचं झालं. ते होते आचार्य अत्रे. अत्र्यांचं ते भाषण इतिहासात अजरामर झालं आहे. त्यानंतर अत्र्यांनी 'मराठा'तून सतत 12 दिवस बाबांच्या जीवनावर आणि तत्त्वज्ञानावर अग्रलेख लिहिले. त्यातील हा 7 डिसेंबरचा पहिला अग्रलेख...
-
विद्रोही साहित्य संमेलन
अखिल भारतीय साहित्य संमेलन कष्टकऱ्यांचं, गरिबांचं, तळागाळातल्या समाजाचं प्रतिनिधित्व करत नाही. त्यांच्यासाठीचं व्यासपीठ म्हणून विद्रोही साहित्य संमेलन सुरू करण्यात आलं. यंदाचं ११वं साहित्य संमेलन पार पडलं अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीत. १९ आणि २० जानेवारीला झालेल्या या साहित्य संमेलनाचं इत्थंभूत वृत्तांकन 'भारत4इंडिया'नं केलं. ते करणारे आमचे प्रतिनिधी राहुळ विळदकर यांनी मांडलेला संमेलनाचा हा लेखाजोखा...