टॉप न्यूज

दुष्काळ निवारणासाठी १,१६४ कोटी

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आज विधिमंडळात सादर झालेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात दुष्काळ निवारणासाठी १,१६४ कोटींची तरतूद करण्यात आलीय. याशिवाय पाणी टंचाईसाठी ८५० कोटींची तरतूद करतानाच सिंचन प्रकल्पांसाठी सात हजार कोटी, तर शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्ध करण्यासाठी ३ हजार २०० कोटींची तरतूद करण्यात आलीय. सरकारनं दुष्काळग्रस्तांसाठी भरीव तरतुदी केल्याचा दावा सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीनं केलाय.

 

Drought

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 2013-14सालचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर केला. निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या कवितेचा दाखला देत त्यांनी सरकारचं प्राधान्य दुष्काळाला असल्याचं सुरुवातीलाच स्पष्ट केलं. तर शेवटी संत बहिणाबाईंच्या कवितेचा दाखला देत त्यांनी सध्याच्या काळात सर्वांनीच मन आभाळाएवढं करण्याची गरज बोलून दाखवली. सरकारचं प्राधान्य दुष्काळग्रस्तांना राहील, याची हमीही त्यांनी आपल्या भाषणात दिली.

 

दुष्काळग्रस्तांना पिण्याचं पाणी आणि जनावरांना चारा देण्यासाठी सरकारचं प्राधान्य राहणार आहे. त्यादृष्टीनं एकूणच दुष्काळ निवारणासाठी अर्थसंकल्पात 1 हजार 164 कोटींची तरतूद करण्यात आलीय. याशिवाय शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी तीन हजार 200 कोटींची तरतूद करण्यात आलीय. तसंच सिंचनावरही सात हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरील तरतुदी

1. खतांसाठी 53 कोटी 50 लाखांची तरतूद
2. चारा विकास कार्यक्रमासाठी 43 कोटींची तरतूद
3. अपुऱ्या सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी 400 कोटींची तरतूद
4. पाणीटंचाईसाठी 850 कोटींची तरतूद
5. दुष्काळासाठी 1,164 कोटींची तरतूद
6. मासे साठवणुकीसाठी 3,765 कोटींची तरतूद
7. शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपल्ब्ध करण्यासाठी 3 हजार 200 कोटींची तरतूद
8. नव्या ऊर्जा प्रकल्पांसाठी 196 कोटींची तरतूद
9. विजेच्या सवलतींसाठी 3,209 कोटींची तरतूद

 

दृष्टिक्षेपात अर्थसंकल्प

 • राज्याचा एकूण दीड लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर
 • वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 100 कोटींची तरतूद
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक उभारणार
 • डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही- अजित पवार
 • खतांसाठी 53 कोटी 50 लाखांची तरतूद
 • कुक्कुटपालन आणि दुग्धोपादन विकासासाठी 68 कोटींची तरतूद
 • पाच सागरी किनारी जिल्ह्यांसाठी 102 कोटी रुपयांची जेट्टी विकासासाठी तरतूद
 • सर्वशिक्षा अभियानासाठी 711 कोटींची तरतूद
 • मुलींच्या विकासासाठी विशेष तरतूद, वसतिगृहासाठी 100 कोटींचा निधी
 • शाळा शिक्षकांना वेतनाव्यतिरिक्त अनुदान देण्यासाठी 266 कोटींची तरतूद
 • ई-लर्निंग आणि प्रयोगशाळांसाठी 152 कोटींची तरतूद
 • क्रीडा आणि युवा धोरणांसाठी 150 कोटींची तरतूद
 • माहिती तंत्रज्ञान विषय शिकवण्यासाठी 113 कोटींची तरतूद
 • पेयजल योजनेसाठी 200 कोटींची तरतूद
 • रस्ते विकासासाठी 2,716 कोटी 67 लाखांची तरतूद
 • रस्ता चौपदरीकरणासाठीचे 12 प्रकल्प विचाराधीन
 • नव्या ऊर्जा प्रकल्पांसाठी 196 कोटींची तरतूद
 • 118 कोटी शासकीय इमारती, कार्यालय आणि निवासस्थानांसाठी
 • अपारंपरिक ऊर्जा विकासासाठी 80 कोटींची तरतूद
 • जनतेपर्यंत वीज पोहोचवण्यासाठी महावितरणला 409 कोटी
 • 2 हजार 500 कोटी रुपये औद्योगिक प्रोत्साहन योजनेसाठी
 • 13 हजार मेगा वॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ठ
 • विजेच्या सवलतींसाठी 3,209 कोटींची तरतूद
 • मुंबईत 15 रस्त्यांची कामं पूर्ण करण्यावर भर
 • मुंबईतील मेट्रो सप्टेंबर 2013 पर्यंत सुरू होणार
 • मिहानच्या पायाभूत सुविधासांठी 200 कोटींची तरतूद
 • निवडक शहरांच्या मंजूर 23 प्रकल्पांना 650 कोटी
 • मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा 2014 पर्यंत पूर्ण होणार
 • म्हाडाच्या राजीव गांधी आवास योजनेस 40 कोटी रुपये प्रस्तावित
 • झोपडपट्टी विकास कार्यक्रमासाठी 220 कोटी रुपये प्रस्तावित
 • नागपूरच्या ताजबागसाठी 20 कोटी आणि सेवाग्रामसाठी 30 कोटींची तरतूद
 • राज्यातल्या पर्यटन विकासासाठी 285 कोटींची तरतूद
 • सिंधुदुर्गच्या सी-वर्ल्डसाठी 100 कोटींची तरतूद
 • प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या निधीची मर्यादा आता 1 कोटीवरून 2 कोटींवर
 • आरोग्य केंद्रासाठी 477 कोटींची तरतूद
 • शालेय पोषण आहारासाठी 1,264 कोटींची तरतूद
 • किशोरींसाठी 'राजीव गांधी सबल योजना'
 • किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणासाठी 110 कोटींची तरतूद
 • महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी 787 कोटींची तरतूद
 • राजीव गांधी योजना संपूर्ण राज्यात राबवली जाणार, यासाठी 325 कोटी रुपयांची तरतूद
 • चारा पुरवठ्यासाठी 186 कोटी रुपये
 • आश्रमशाळा बांधकामासाठी 501 कोटींची तरतूद
 • आदिवासी भागातल्या आरोग्य सुविधांसाठी 244 कोटींची तरतूद
 • अल्पसंख्याकांच्या योजनांसाठी 280 कोटींची तरतूद
 • बँकांच्या भरतीसाठी प्रशिक्षण देणार
 • मौलाना आझाद महामंडळासाठी 500 कोटींची तरतूद
 • धान्य साठवणुकीसाठी नव्या गोदामांना 24 कोटी
 • संग्रहालयांच्या संवर्धनासाठी 37 कोटींची तरतूद
 • कोल्हापूर चित्रनगरीसाठी विशेष निधी देणार
 • मोठ्या शहरांमध्ये सीसी टीव्हींसाठी 150 कोटींची तरतूद
 • पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 317 कोटींची तरतूद
 • पोलीस ठाणे आणि पोलिसांच्या निवासस्थानांसाठी 188 कोटींची तरतूद
 • ई-ऑफिस प्रणाली मंत्रालयात सुरू करण्यात आली
 • प्रसिद्ध मराठी पुस्तकांचं ई-बुकमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव
 • नळजोडणीसाठी प्रतिकुटुंब 4 हजार रुपये अनुदान
 • महाराष्ट्र सुवर्णजंयती नगरोत्थान निधी
 • आम आदमी विमा योजनेसाठी 34 कोटींची तरतूद
 • राज्यात 584 नवीन गोदामं बांधणार
 • राज्यात 5 वर्षांसाठी करमणूक कर माफ
 • विक्रीकर विभागाचं संगणकीकरण, कर चुकवेगिरीवर कारवाई करणार
 • सिगारेटवरील कर 20 टक्क्यांवरून 25 टक्के आणि विडीवरील कर 7 टक्क्यांवरून साडेबारा टक्के
 • औद्योगिक वापराच्या सोनं, चांदीवरील कर 1 टक्क्यांवरुन 5 टक्के
 • औद्योगिक वापरांच्या कपड्यांवर 5 टक्के कर
 • सौंदर्य प्रसाधनांवरील कर 5 टक्क्यावरून साडेबारा टक्के
 • सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवरील कर आता 1 टक्क्यावरुन 1.10 टक्के
 • उसाच्या खरेदीवरील कर आता 3 टक्क्यावरुन 5 टक्क्यावर
 • राज्याच्या विमानतळ विकासासाठी 39 कोटींची तरतूद
 • साप्ताहिक लॉटरी योजनेवर 60 हजार आणि बंपर लॉटरीवर 12 लाख कर
 • भटके विमुक्तांना शौचालय उभारणीसाठी निधी
 • देशी - विदेशी दारू महागणार
 • बेदाणे आणि मनुकांवरील कर मार्च 2014 पर्यंत राहील
 • राईस ब्रॅण्ड करमुक्त
 • वॉटर मीटर आणि हातपंपावरील कर माफ
 • अपंगाचं घड्याळ आणि वाहन करमुक्त

Comments

 • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.