टॉप न्यूज

शेतकरी संघटना एकत्र

ब्युरो रिपोर्ट

सांगली - पश्चिम महाराष्ट्रात ऊस आंदोलनाचा वणवा पेटवणाऱ्या शेतकरी संघटना आता एकत्र आल्यात. वेगवेगळ्या शेतकरी संघटनेच्या नेतेमंडळींनी एकीची वज्रमूठ घट्ट केलीय. शरद जोशी, ‘स्वाभीमान’चे सदुभाऊ खोत आणि रघुनाथदादा पाटील यांचे प्रतिनिधी प्रदीप पाटील या तिघांची आज सकाळी सांगलीतील सर्कीट हाऊसवर बैठक झाली. येत्या २१ नोव्हेंबर रोजी सांगलीत ऊस परिषद घेण्यात येणार आहे. त्यावेळी सर्व नेतेमंडळी या व्यासपीठावर एकत्र येऊन नव्याने आंदोलनाचा बिगुल वाजवणार आहेत. 

दोन्ही नेत्यांच्या खांद्यावर हात ठेऊन `मी आता म्हातारा झालोय. किती दिवस जगणार याची खात्री नाही. तुम्ही माझे जुने मावळे आहात. त्यामुळं हा गाडा तुम्हालाच सांभाळायचाय.` असे म्हणत शरद जोशी भावूक झाले. त्यांचा थरथरता हात हातात घेतलेले नेतेही गहिवरले, आणि पुन्हा एकीचा निर्धार पक्का झाला. सद्परिस्थितीत आंदोलन शांततेनं सुरू ठेवा. चावडीवर मोर्चे काढा, मंत्र्याना गावबंदी करा आणि निरपराध शेतकऱ्यांवर गोळ्या का झाडल्या, ऊसाला दर देणार की नाही, याचा जाब विचारा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.  

दरम्यान सरकारच्या वतीने गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शेतकऱ्यांनी हिंसेचा मार्ग अवलंबू नये, असं आवाहन केलंय.

ऊसदराच्या प्रश्नावरून आंदोलन सुरु असतानाच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काही ठिकाणी दूध संकलनही बंद केलंय.   

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.