टॉप न्यूज

एनडीएला धक्का- भाजप

ब्युरो रिपोर्ट

दिल्ली- राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचा प्रमुख सहकारी पक्ष म्हणजे शिवसेना. एनडीएचा मोठा आधारस्तंभ म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे बाळासाहेबांच्या निधनानं एनडीएला मोठा धक्का बसल्याचं, भाजपनं म्हटलंय. आमचा आधारस्तंभ गेल्याची प्रतिक्रिया भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केलीय.

बाळासाहेब महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते होते. त्यांच्या निधनानं देशाला मोठा झटका बसलाय, त्याचबरोबर एनडीएसाठीही ही मोठी हानी असल्याचं त्यांनी म्हटलंय. 'राजा असावा, छत्रपती शिवाजीमहाराजांसारखाआणि राज्य शिवराज्यासारखं असावं, देशात शिवशाही यावी असं बाळासाहेबांचं स्वप्न होतं' असंही गडकरी यानिमित्तानं म्हटलंय

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली. एका युगाचा अंत झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. बाळासाहेब एका योद्ध्यासारखं जीवन जगले. आपल्या विचारांनी देशात त्यांनी वेगळं स्थान निर्माण केलं, असंही ते यावेळी म्हणाले.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.