टॉप न्यूज

शिवाजी पार्कवर अंत्यदर्शन

ब्युरो रिपोर्ट

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची महायात्रा सकाळी साडेसहा वाजता मातोश्रीवरून निघेल. त्यांचं पार्थीव सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत शिवाजी पार्कवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

संध्याकाळी 6 वाजता त्यांच्यावर शिवाजीपार्क इथंच अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

दरम्यान राज्यभरातून येणाऱ्या शिवसैनिकांनी मातोश्रीवर येऊन गर्दी करू नये, सकाळी शिवाजीपार्कवर शिवसेनाप्रमुखांचं अंतिम दर्शन घ्यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.