टॉप न्यूज

सीमाभाग गहिवरला

ब्युरो रिपोर्ट

बेळगाव- शिवसेना आणि बेळगाव सीमाप्रश्न लढा यांचं नातं अतूट आहे. कर्नाटक सीमेवरची बेळगाव आणि इतर मराठी गावं महाराष्ट्रात यावीत म्हणून शिवसेनेनं वेळोवेळी तीव्र आंदोलनं केली. सीमेवरचा हा मराठी समाज महाराष्ट्रात यावा अशी बाळासाहेबांचं स्वप्न होतं. पण हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यापूर्वीच त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. आज या सीमाभागानं कडकडीत बंद पाळून लढाईला बळ देणाऱ्या आपल्या या सेनापतीला आदरांजली वाहिली. 

जनतेनं स्वयंस्फूर्तीनं बंद पाळला. येळ्ळूर गावात रात्री लोकांनी भव्य मशाल मोर्चा काढला. आज बेळगाव शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या.

बाळासाहेबांच्या निधनानं सीमाभाग पोरका झाल्याची भावना सीमावासीय बोलून दाखवत आहेत. 

भाषावार प्रांतरचना झाल्यापासून बेळगावातील मराठी भाषिकांच्या आंदोलनात शिवसेना कायम सक्रीय राहिली आहे. एक नोव्हेंबर 1967ला काळ्या दिनात सहभागी होण्यासाठी बाळासाहेब बेळगावला आले होते. त्यानंतर 1983मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकीकरण समितीचे दिवंगत आमदार बॅरिस्टर राजाभाऊ माने यांच्या प्रचारासाठी बाळासाहेबांनी जाहीर सभा घेतली होती. बेळगाव तालुक्यातील कडोली इथं दिवंगत माजी आमदार जी. एल. अष्टेकर यांच्या प्रचारासाठीही बाळासाहेबांनी सभा घेतली होती. त्या सभेला तुफान गर्दी झाली होती. यानिमित्तानं या सभेची आठवण सीमा लढ्यातील जेष्ठ नेते जागवतायत. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.